एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे विन्यासा योग स्पर्धा

शंभरहून अधिक स्पर्धकांकडून योगासनांची प्रात्यक्षिके बेळगाव : 21 जून रोजी होणाऱ्या योग दिनाच्या निमित्ताने एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे ‘विन्यासा’ ही योग स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी धन्वंतरी पूजन करण्यात आले. डॉ. अमृता लाड यांनी प्रास्ताविक केले. आयर्न मॅन डॉ. किरण खोत यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना योगाचे महत्त्व सांगितले. डॉ. अडिवेश अरकेरी यांनी अध्यक्षीय समारोप […]

एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे विन्यासा योग स्पर्धा

शंभरहून अधिक स्पर्धकांकडून योगासनांची प्रात्यक्षिके
बेळगाव : 21 जून रोजी होणाऱ्या योग दिनाच्या निमित्ताने एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे ‘विन्यासा’ ही योग स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी धन्वंतरी पूजन करण्यात आले. डॉ. अमृता लाड यांनी प्रास्ताविक केले. आयर्न मॅन डॉ. किरण खोत यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना योगाचे महत्त्व सांगितले. डॉ. अडिवेश अरकेरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. यानंतर झालेल्या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. सर्व विजेत्यांना वैद्यकीय संच आणि मोफत पंचकर्म उपचाराची सुविधा देण्यात आली. डॉ. सुमित, डॉ. अश्विनी, डॉ. अरुण, डॉ. चेतन, केशव कुलकर्णी, प्रभाकर लाटूकर, अमूल जैन, रश्मी चव्हाण, श्रीधर मोरबद, सावित्री शेट्टमन्नवर, किशोर थोरात व प्रतिभा धामणेकर यांनी परीक्षक म्हणून काम केले.