विनायक राऊतांनी केली सावंतवाडी बसस्थानकाची पाहणी

स्थानकाच्या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा सावंतवाडी  | प्रतिनिधी सावंतवाडी बसस्थानकाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या परिसरात चिखलमय खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे . बस्थानकाच्या इमारतीवर झाडेझुडपे वाढली असून शौचालयात अस्वच्छता पसरली आहे .अशा या बस स्थानकाची तात्काळ पाहणी करून आणि येत्या आठ दिवसात हे बस स्थानक सुधारायला हवेत असे एसटी मंडळाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांना माजी […]

विनायक राऊतांनी केली सावंतवाडी बसस्थानकाची पाहणी

स्थानकाच्या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा
सावंतवाडी  | प्रतिनिधी
सावंतवाडी बसस्थानकाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या परिसरात चिखलमय खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे . बस्थानकाच्या इमारतीवर झाडेझुडपे वाढली असून शौचालयात अस्वच्छता पसरली आहे .अशा या बस स्थानकाची तात्काळ पाहणी करून आणि येत्या आठ दिवसात हे बस स्थानक सुधारायला हवेत असे एसटी मंडळाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांना माजी खासदार विनायक राऊत यांनी सूचना करत सावंतवाडी बस स्थानकाची पाहणी श्री राऊत यांनी केली. यावेळी एकंदरीत बस स्थानक परिसराची पाहणी करून झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.