परवानगी नसेल तर पोल काढायला लावू
कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांचे इन्सुली शेतकऱ्यांना आश्वासन
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली येथील तिलारी कालव्याच्या जागेतून महावितरणचे लाइनचे काम सुरू असलेची तक्रार मंगळवारी ग्रामस्थांनी केली. मंगळवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित विजवितरणचे अभियंता कोहळे यांना वीज लाईन टाकली त्याची परवानगी दाखवा जर परवानगी नसेल तर आम्ही पोल काढायला लावू असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यावेळी विजवितरण विभागाने शेतकऱ्यांचे न ऐकता केवळ धनदांडग्याचे ऐकून तुम्ही त्यांचे काम प्राधान्याने करता असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
इन्सुली येथील तिलारी कालव्याच्या जागेतून उच्च दाबाच्या लाइन टाकण्याचे काम खाजगी ठेकेदार करत आहे. सदर कामाला शेतकऱ्यांनि विरोध केला. तर या ठिकाणी उभारण्यात आलेले पोल काढून टाकण्यास शेतकऱ्यांनी त्यास सांगितले. तर याबाबतचा लेखी अर्ज पाटबंधारे विभागाला दिला. त्या अर्जाची दखल घेत कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी इन्सुली येथे शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी संतोष मोरजकर, हेमंत नाईक, साईप्रसाद राणे, महेंद्र सावंत, संदीप कोठावळे, जगन्नाथ वारंग आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच विजवितरणचे अभियंता कोहळे व तिलारीचे अभियंता तुषार पेडणेकर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी परवानगी नसेल तर पोल काढायला लावू
परवानगी नसेल तर पोल काढायला लावू
कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांचे इन्सुली शेतकऱ्यांना आश्वासन प्रतिनिधी बांदा इन्सुली येथील तिलारी कालव्याच्या जागेतून महावितरणचे लाइनचे काम सुरू असलेची तक्रार मंगळवारी ग्रामस्थांनी केली. मंगळवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित विजवितरणचे अभियंता कोहळे यांना वीज लाईन टाकली त्याची परवानगी दाखवा जर परवानगी नसेल तर आम्ही पोल काढायला […]
