विनयकुमार भारताचे रशियातील नवे राजदूत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
परराष्ट्र मंत्रालयाने विनयकुमार यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली. सध्या म्यानमारमध्ये भारताचे राजदूत असलेले विनयकुमार लवकरच नवीन कार्यभार स्वीकारतील. 2021 मध्ये त्यांची म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2018-2020 पर्यंत त्यांनी अफगाणिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (दक्षिण) पदही भूषवले आहे. तसेच ताश्कंद, बिश्पेक, ओटावा येथील भारतीय मोहिमांमध्ये काम केले आहे. वॉर्सा, तेहरान, न्यूयॉर्क आणि काठमांडू येथील भारताच्या कायमस्वरूपी मोहिमांमध्येही त्यांचे योगदान आहे.
Home महत्वाची बातमी विनयकुमार भारताचे रशियातील नवे राजदूत
विनयकुमार भारताचे रशियातील नवे राजदूत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली परराष्ट्र मंत्रालयाने विनयकुमार यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली. सध्या म्यानमारमध्ये भारताचे राजदूत असलेले विनयकुमार लवकरच नवीन कार्यभार स्वीकारतील. 2021 मध्ये त्यांची म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2018-2020 पर्यंत त्यांनी अफगाणिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (दक्षिण) पदही भूषवले आहे. तसेच […]
