पंचायत सदस्यांविना घेतली ग्रामविकास समिताची सभा

लाटंबार्से ग्रामस्थांत नाराजी, सरपंचानी ऐकून घेतली गाऱ्हाणी वार्ताहर /लाटंबार्से लाटंबार्से पंचायत सभागृहात ग्रामविकास आराखडा ठरविण्यासाठी लाटंबार्से ग्रामविकास समितीची सभा नुकतीच सरपंच पद्माकर मळीक यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. परंतु या सभेला एकही पंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सभेला सरपंच पद्माकर मळीक आणि सचिव रामदास वळवईकर उपस्थित होते.  याची माहिती डिचोली गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात […]

पंचायत सदस्यांविना घेतली ग्रामविकास समिताची सभा

लाटंबार्से ग्रामस्थांत नाराजी, सरपंचानी ऐकून घेतली गाऱ्हाणी
वार्ताहर /लाटंबार्से
लाटंबार्से पंचायत सभागृहात ग्रामविकास आराखडा ठरविण्यासाठी लाटंबार्से ग्रामविकास समितीची सभा नुकतीच सरपंच पद्माकर मळीक यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. परंतु या सभेला एकही पंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सभेला सरपंच पद्माकर मळीक आणि सचिव रामदास वळवईकर उपस्थित होते.  याची माहिती डिचोली गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात यावी असे ग्रामस्थांनी सांगितले. पंचायत सदस्यांना मांडण्यात आलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मागील सभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या ठरावांचे सचिव रामदास वळवईकर यांनी वाचन केले. परंतु सदर कामांचा पाठपुरावा किंवा जमीन मालकांकडून ना हरकत दाखला न मिळाल्याने वाचण्यात आलेली बहुतेक कामे रखडून पडली आहेत. प्राधान्यक्रमाने नानोडा येथील स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता, पाणी आणि वीज हे विषय मांडून ठराव घेण्यात आले होते. ग्रामस्थांनी आपल्या कामांचे प्रŽ सभेत मांडले.  काही अनुभवी ग्रामस्थ उपस्थित असल्याने चांगल्या सूचना पंचायतीच्या निदर्शनास आणून दिल्या.