Satara : कालेचे ग्रामदैवत व्यंकनाथ देवाची यात्रा उत्साहात
काले ग्रामदैवताच्या नामस्मरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
काले : व्यंकनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत काले (ता. कराड) येथील ग्रामदैवत श्री व्यंकनाथ देवाची बुधवारपासून सुरू असलेली यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली.
शुक्रवार १४ रोजी रात्री ६ वाजता व्यंकनाथ जीर्णोध्दार समिती व प्रेरणा प्रतिष्ठान काले यांच्यावतीने आयोजित १००० पणत्यांचा दीपोस्तव साजरा करण्यात आला. शनिवार १५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. यादिवशी पहाटे ५ वाजता पुजारी आनंदा गुरव यांनी श्री व्यंकनाथ देवाची पुजा करुन काकड आरती करण्यात आली. ५.३० वाजता श्री व्यंकनाथ देवाचा छबिना व श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
छबिना व सासनकाठ्या नाचवत गुलाल खोबऱ्याची उधळण करीत मिरवणूक व्यंकनाथ मंदिरातून चावडी चौक, शिवाजी चौक मार्ग बाजारपेठेतून पुन्हा मंदिरात प्रवेश केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी व्यंकनाथाच्या नावानं चांगभलंचा गजर करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शन घेतले. छबिन्यासाठी काले व परिसरातील भाविकांसह मालखेड, सांगली, कोल्हापूर येथील भाविक मोठ्या संख्येने आले होते. या यात्रेमध्ये श्री जोतिबा, नाईकबा, भैरवनाथ, व्यंकनाथ या देवांच्या मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.
यात्रेसाठी काले परिसरातील संजयनगर, झुंजारवाडी, नारायणवाडी, धोंडेवाडी, मुनावळे, कालेटेक या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यंकनाथ यात्रा कमिटी व काले ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
Home महत्वाची बातमी Satara : कालेचे ग्रामदैवत व्यंकनाथ देवाची यात्रा उत्साहात
Satara : कालेचे ग्रामदैवत व्यंकनाथ देवाची यात्रा उत्साहात
काले ग्रामदैवताच्या नामस्मरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग काले : व्यंकनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत काले (ता. कराड) येथील ग्रामदैवत श्री व्यंकनाथ देवाची बुधवारपासून सुरू असलेली यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. शुक्रवार १४ रोजी रात्री ६ वाजता व्यंकनाथ जीर्णोध्दार समिती […]
