विजया, लक्ष्य अकादमींचा विजयी

बेळगाव : केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमी अ संघाने रॉजर क्रिकेट अकादमी अ संघाचा तर लक्ष्य क्रिकेट अकादमी ब ने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविली. मनोज सुतार (विजया), अमित यादव (लक्ष्य) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात रॉजर […]

विजया, लक्ष्य अकादमींचा विजयी

बेळगाव : केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमी अ संघाने रॉजर क्रिकेट अकादमी अ संघाचा तर लक्ष्य क्रिकेट अकादमी ब ने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविली. मनोज सुतार (विजया), अमित यादव (लक्ष्य) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात रॉजर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 27. 5 षटकात सर्व गडी बाद 162 धावा केल्या. त्यात विरेश गौडरने 3 षटकार, 2 चौकारासह 37, अभिषेकने 20, विनीत पाटीलने 19, अक्षयने 16 धावा केल्या. विजया क्रिकेट अकादमीतर्फे सचिन साळुंखेने 24 धावात 3, तर स्वयम, पार्थ, अमोघ यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया क्रिकेट अकादमीने 24.4 षटकात 5 गडी बाद 163 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात मनोज सुतारने 4 षटकार 8 चौकारासह 86, रघुवीरने 4 चौकारासह नाबाद 26 धावा केल्या. रॉर्जरतर्फे उमेश गोरलने 2, तर सुनील, वीरेश, संभाजी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुपारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25.1 षटकात सर्व गडी बाद 104 धावा केल्या. त्यात आर्यन गवळीने व अर्णव कुंदप यांनी प्रत्येकी 4 चौकारासह 23, सोमनाथने 19, तर विनयने 12 धावा केल्या. लक्षतर्फे क्रांतीकुमारने 22 धावात 5, सुमीतने 3 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष्य क्रिकेट अकादमी ब ने 6.4 षटकात 2 गडीबाद 108 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अमय यादवने 4 चौकार 2 षटकारसह 34, दर्शन पाटीलने नाबाद 34 धावा केल्या.