भारतीय स्क्वॅशपटूंची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ जोहोर (मलेशिया) आशिया दुहेरीच्या स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या अभयसिंगने विजयी सलामी दिली. पहिल्या दिवशीच भारतीय संघाने पाच पैकी चार सामने जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या अभयसिंगने वेलावेन समवेत या स्पर्धेच्या पहिल्या  सामन्यात फिलीपिन्सच्या पेलीनो आणि बेगोरिना यांचा 2-0(11-4, 11-6) अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीत अभयसिंग आणि जोत्स्ना चिन्नाप्पा यांनी […]

भारतीय स्क्वॅशपटूंची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ जोहोर (मलेशिया)
आशिया दुहेरीच्या स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या अभयसिंगने विजयी सलामी दिली. पहिल्या दिवशीच भारतीय संघाने पाच पैकी चार सामने जिंकले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या अभयसिंगने वेलावेन समवेत या स्पर्धेच्या पहिल्या  सामन्यात फिलीपिन्सच्या पेलीनो आणि बेगोरिना यांचा 2-0(11-4, 11-6) अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीत अभयसिंग आणि जोत्स्ना चिन्नाप्पा यांनी क गटातील सामन्यात फिलीपिन्सच्या डेलिडा व बेगोरिना यांचा 11-4, 11-3 असा पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात अभयसिंग आणि जोत्स्ना यांनी सिंगापूरच्या नेशासिंग आणि अॅन्डर्स जून यांचा 11-3, 11-6 असा पराभव केला. महिलांच्या दुहेरीत भारताच्या रतिका सेलन आणि पूजा आर. यांनी एक सामना जिंकला तर एक सामना गमविला.