भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ केपटाऊन भारतीय पुरूष हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून येथे सुरू झालेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने फ्रान्सचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रितने 2 गोल केले. त्याने 13 व्या आणि 26 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सवर हे गोल नोंदविले. ललित उपाध्यायने 42 व्या मिनिटाला तर उपकर्णधार […]

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारतीय पुरूष हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून येथे सुरू झालेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने फ्रान्सचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रितने 2 गोल केले. त्याने 13 व्या आणि 26 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सवर हे गोल नोंदविले. ललित उपाध्यायने 42 व्या मिनिटाला तर उपकर्णधार हार्दिक सिंगने 49 व्या मिनिटाला गोल केले. या लढतीतील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळावर भर दिला होता. भारताच्या हरमनप्रितने 13 व्या मिनिटाला भारताचे खाते पेनल्टी कॉर्नवर उघडले. 26 व्या मिनिटाला आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रितने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. ललित उपाध्यायने 42 व्या तर उपकर्णधार हार्दिक सिंगने 49 व्या मिनिटाला गोल केले. फ्रान्सला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या चौरंगी स्पर्धेत भारताचा दुसरा सामना बुधवारी पुन्हा फ्रान्सबरोबर होणार आहे. या स्पर्धेमध्ये फ्रान्स, नेदरलँड्स, भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना येत्या शुक्रवारी तर भारताचा नेदरलँड्स बरोबरचा सामना रविवारी खेळविला जाणार आहे.