जनसंपर्कामुळेच विजयाला गवसणी

मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी विजयी होण्यास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कारणीभूत आहेत. याबरोबरच जनतेशी ठेवलेल्या संपर्कामुळेच त्यांनी आशीर्वाद दिला आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक हिलगार्डन येथे गृह कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये विकासाभिमुख योजना, गॅरंटी […]

जनसंपर्कामुळेच विजयाला गवसणी

मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी विजयी होण्यास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कारणीभूत आहेत. याबरोबरच जनतेशी ठेवलेल्या संपर्कामुळेच त्यांनी आशीर्वाद दिला आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक हिलगार्डन येथे गृह कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये विकासाभिमुख योजना, गॅरंटी योजना, तसेच गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेली जनसेवा प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयाला लाभदायक ठरली आहे. जनता कोणावरही इतक्या सुलभपणे विश्वास ठेवणार नाही. पक्ष पाहिला जातो, व्यक्ती पाहिली जाते. जनतेशी निरंतर संपर्क यामुळेच विजय सोपा ठरला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून प्रियांका जारकीहोळी यांना तिकीट दिल्यामुळे विजयाला महत्त्वाचे कारण ठरले आहे.
आपल्या पक्षातीलच काही जणांकडून आपल्या विजयात आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मताधिक्य कमी मिळाले आहे. उद्देशपूर्वक असे कृत्य करण्यात आले आहे. ही बाब केपीसीसीच्या निदर्शनास आणून देऊ. निवडणुकीमध्ये असे प्रकार होतच राहतात, असेही त्यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील झालेल्या काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, या पराभवाची अनेक कारणे आहेत. ती कारणे सुधारली गेली असती तर विजय आपला असता. विरोधकांचे धोरण ओळखून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे होते, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.