इटालियन स्पर्धेत व्हेरेव्ह विजेता

वृत्तसंस्था/ रोम रविवारी येथे झालेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील इटली खुल्या मास्टर्स 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हने एकेरीचे जेतेपद पटकाविताना 24 व्या मानांकित निकोलास जेरीचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात व्हेरेव्हने जेरीचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद हस्तगत केले. व्हेरेव्हचे या स्पर्धेतील हे दुसरे जेतेपद आहे. येत्या रविवारपासून […]

इटालियन स्पर्धेत व्हेरेव्ह विजेता

वृत्तसंस्था/ रोम
रविवारी येथे झालेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील इटली खुल्या मास्टर्स 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हने एकेरीचे जेतेपद पटकाविताना 24 व्या मानांकित निकोलास जेरीचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात व्हेरेव्हने जेरीचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद हस्तगत केले. व्हेरेव्हचे या स्पर्धेतील हे दुसरे जेतेपद आहे. येत्या रविवारपासून फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेला प्रारंभ होत असून जर्मनीचा व्हेरेव्ह हा एकेरीतील फेव्हरिट विजेता म्हणून ओळखला जात आहे. या स्पर्धेत व्हेरेव्हने आतापर्यंत 3 वेळेला अंतिम फेरी गाठली आहे. 2017 साली या स्पर्धेत व्हेरेव्हने जोकोविचचा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत व्हेरेव्हने जेतेपदबरोबरच आकर्षक चषक व 10 लाख डॉलर्स बक्षीसची रक्कम पटकाविली.
या स्पर्धेत सारा इराणी आणि जस्मिन पाओलिनी या इटालियन जोडीने महिला दुहेरीचे जेतेपद मिळविताना अमेरिकेची काको गॉफ व इरिन रुटलिफचा 6-3, 4-6, 10-8 असा पराभव केला. मार्सेल ग्रेनोलर्स व झेबालोस यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविताना मार्सेलो अॅरव्हेलो व पेव्हीक यांचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला.