वेंगुर्लेचे सुपुत्र संदेश कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले मधला परबवाडा येथील रहिवासी संदेश रमाकांत कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत उल्लेखनीय सेवा बजावली आहे. वेंगुर्ले येथील संदेश कुबल यांनी १ एप्रिल १९९१ रोजी पोलीस दलात भरती होऊन आपली सेवा सुरू केली. त्यांनी आतापर्यंत ३४ वर्षांची अखंड सेवा पूर्ण केली असून सध्या त्यांचे ३५ वे सेवा वर्ष सुरू आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. त्यांनी आपल्या सेवेत नियंत्रण कक्ष, मालवण पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एल.सी.बी.) सिंधुदुर्ग, तसेच मोटार परिवहन विभाग सिंधुदुर्ग अशा विविध शाखांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कामात नेहमी सतर्क, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून संदेश कुबल यांची ओळख आहे. त्यांच्या बढतीबद्दल पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या सह सहकारी कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी आणि वेंगुर्ला परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Home महत्वाची बातमी वेंगुर्लेचे सुपुत्र संदेश कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती
वेंगुर्लेचे सुपुत्र संदेश कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती
वेंगुर्ले (वार्ताहर)- वेंगुर्ले मधला परबवाडा येथील रहिवासी संदेश रमाकांत कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत उल्लेखनीय सेवा बजावली आहे. वेंगुर्ले येथील संदेश कुबल यांनी १ एप्रिल १९९१ रोजी पोलीस दलात भरती होऊन आपली सेवा सुरू केली. त्यांनी आतापर्यंत ३४ वर्षांची अखंड सेवा पूर्ण केली असून […]
