शाकाहारी, मांसाहारी थाळी झाली स्वस्त!

पुणे : कांदा आणि टोमॅटोच्या किंमती घसरल्यानंतर शाकाहारी थाळीच्या किंमतीत तीन टक्क्यांची घसरण झाली आहे तर डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीच्याकिंमतीत पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली.

शाकाहारी, मांसाहारी थाळी झाली स्वस्त!

पुणे : कांदा आणि टोमॅटोच्या किंमती घसरल्यानंतर शाकाहारी थाळीच्या किंमतीत तीन टक्क्यांची घसरण झाली आहे तर डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीच्याकिंमतीत पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली.

मार्केट इंटेलिजन्स अँड अ‍ॅनालिटिक्स रिसर्चच्या ‘राइस रोटी रेट’अहवालानुसार, घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचे दर डिसेंबरमध्ये अनुक्रमे तीन टक्के आणि पाच टक्क्यांनी घसरले. शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या दरात घसरण होण्याचे कारण म्हणजे कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीतील झालेली घसरण.

 

डिसेंबरमध्ये मासिक आधारावर कांद्याचे भाव 14 टक्के आणि टोमॅटोचे दर तीन टक्क्यांनी घसरले आहेत. सणासुदीचा हंगाम संपल्याने घरातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणा-या या भाज्यांचे दर कमी झाले आहेत. मासिक आधारावर ब्रॉयलरच्या किंमतीत पाच-सात टक्के घट झाल्यामुळे मांसाहारी थाळीची किंमत कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मांसाहारी थाळीच्या खर्चात ब्रॉयलरचा वाटा 50 टक्के आहे.

घरच्या घरी थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील थाळी तयार करण्याच्या किमतींच्या आधारे काढला जातो. धान्य, कडधान्ये, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींनुसार थाळीच्या किंमतीत बदल होत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते

Edited By – Ratnadeep ranshoor 

Go to Source