अनमोड चेकनाक्यावर भाजी-दुधाच्या गाड्या अडवल्या

वार्ताहर /रामनगर  अनमोड अबकारी चेकनाक्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून गोवा राज्यात तसेच गोवा राज्यातून कर्नाटक तसेच इतर राज्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची सहा चाकी वाहने अडवून ठेवण्यात आली आहेत. कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहा चाकी तसेच त्याहून अधिक वाहनांना अनमोड घाटमार्ग तीन महिन्यांसाठी बंद केला आहे. त्यामुळे अनमोड घाटमार्गावरून सहा व त्याहून अधिक चाकी सर्व वाहनांना पोलीस […]

अनमोड चेकनाक्यावर भाजी-दुधाच्या गाड्या अडवल्या

वार्ताहर /रामनगर 
अनमोड अबकारी चेकनाक्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून गोवा राज्यात तसेच गोवा राज्यातून कर्नाटक तसेच इतर राज्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची सहा चाकी वाहने अडवून ठेवण्यात आली आहेत. कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहा चाकी तसेच त्याहून अधिक वाहनांना अनमोड घाटमार्ग तीन महिन्यांसाठी बंद केला आहे. त्यामुळे अनमोड घाटमार्गावरून सहा व त्याहून अधिक चाकी सर्व वाहनांना पोलीस विभागाकडून बंद करण्यात आले आहे.
वास्तविक सरकारी बसेसनाही सदर मार्गावरून जाण्यास बंदी आहे. परंतु नागरिकांचे हाल होऊ नयेत या दृष्टिकोनातून सरकारी बसेसना तेव्हढेच अनमोड मार्गावरून सोडण्यात येत होते. तर नुकत्याच घेतलेल्या बैठकीत कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना म्हणजेच भाजी, दूध वाहन तसेच अॅम्बुलन्स सोडण्याबाबत सांगितले होते. परंतु इतर वाहनधारकांनी तक्रार केली. त्यांना सोडता येते तर आम्हाला का नाही? असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवा म्हणण्यात आले.
कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी बैठकीत सांगितले की, आदेशपत्र न काढल्याने पोलीस विभागाने अनमोड नाक्यावरून जाणाऱ्या सहा चाकी वाहनांना अडवण्यात आले आहे. तर याबाबत कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा करण्यात आली असता आपण पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना अत्यावश्यक वाहनांना सोडण्याबाबत सांगितले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या गैरसमजुतीमुळे अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या भाजी तसेच इतर वस्तू नासाडी बनत आहे. याबाबत कर्नाटक सरकार तसेच गोवा सरकारही कोणतीच आपली भूमिका मांडत नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अनमोड मार्गावरील खड्डेही बुजवण्यात आले असून सर्व वाहनांना जाण्यास रस्ताही अनुकूल करण्यात आला आहे. तरीही विनाकारण अनमोड घाटमार्ग बंद केल्याने वाहनधारकांबरोबरच या रस्त्यावर अवलंबून उपजीविका करणाऱ्यांना मोठा मनस्ताप झाला आहे. तर सध्या चोर्ला व जांबोटीमार्गेही वाहनांना वेळेचे बंधन घालण्यात आल्याने अनमोड मार्ग खुला केल्यास कर्नाटकातून गोवा तसेच गोव्यातून कर्नाटकात येणे सुलभ होणार आहे. तर सध्या अनमोड रस्ता खराब हे कारण पुढे करत कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी बंदचा आदेश दिला आहे. परंतु सर्व वाहने रामनगर येथून अनमोडपर्यंत जाऊन पुन्हा तेथून परतत आहेत. त्यामुळे रस्त्याचे कामही करणार नाही व रस्ताही बंद हे कितपत योग्य? असे विचारण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे.