Veer Savarkar Punyatithi 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
प्रखर राष्ट्रभक्तीचा मंत्र देणाऱ्या,
अथांग सागरालाही आपल्या साहसाने थक्क करणाऱ्या
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
“ने मजसी ने परत मातृभूमीला, सागर प्राण तळमळला…”
अशी आर्त साद घालणाऱ्या थोर क्रांतीसूर्याला पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
ज्यांच्या विचारात क्रांतीची आग होती आणि काळजात देशाचे प्रेम…
अशा महान विनायक दामोदर सावरकरांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा!
अंदमानच्या काळकोठडीतही ज्यांची लेखणी थांबली नाही,
ज्यांनी भिंतीवर महाकाव्य कोरले…
त्या प्रज्ञावंत महापुरुषाला विनम्र अभिवादन!
सावरकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे, एक ऊर्जा आहे!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस वंदन
“अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला…”
मृत्यूलाही ज्यांनी आपल्या धैर्याने हरवले,
त्या स्वातंत्र्यवीरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
हिंदुहृदयसम्राट, थोर समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
ज्यांनी परदेशी कापडाची होळी पेटवून स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला,
अशा धगधगत्या ज्वालामुखील महामानवास मानाचा मुजरा!
‘मातृभूमीच्या चरणी मरण ते जनन’ मानणाऱ्या थोर क्रांतीकारकास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
विज्ञानाचा पुरस्कार करणारे, अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करणारे द्रष्टे महापुरुष सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र वंदन!
शस्त्र आणि शास्त्र यांचा संगम ज्यांच्या विचारात होता,
त्या विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन!
देहाकडून देवाकडे जाताना ज्यांना ‘देश’ लागला,
अशा महान आत्मार्पण करणाऱ्या वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!
