वेदांत, पाकी, अरुण जलद जलतरणपटू
बेळगाव : महाराष्ट्र विजयदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर अॅक्वेटिक संघटना आयोजित खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व एक्वेरियस क्लबचे जलतरणपटू वेदांत मिसाळे, पाकी हलगेकर, व अरुण जाधव यांना स्पर्धेतील जलद जलतरणपटूचा बहुमान मिळवला आहे. त्यामध्ये वेदांत मिसाळाने गट दोनमध्ये 2 कि.मी. जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक, पाकी हलगेकरने गट एक मध्ये एक कि.मी. जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. अरुण जाधवने 35 ते 50 वयोगटात दोन कि.मी. जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. त्याशिवाय अनिश पै.ने गट तीन मध्ये 3 कि.मी. स्पर्धेत दुसरा क्रमांक, ऐहिका हलगेकरने गट दोन मध्ये तिसरा क्रमांक, स्कंद गाडगेने गट एक मध्ये तिसरा क्रमांक, विहान कोरेने गट दोन मध्ये 2 कि.मी. स्पर्धेत सहावा क्रमांक, श्रीदत्ता पुजारीने गट 2 मध्ये सहावा क्रमांक, आर्यवंश गायकवाडने गट 3 मध्ये 3 कि.मी. जलतरण स्पर्धेत आठवा क्रमांक तर युवराज बावडेकरने गट 3 मध्ये 3 कि.मी. जलतरण स्पर्धेत दहावा क्रमांक पटकावला. या सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगांवकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी वेदांत, पाकी, अरुण जलद जलतरणपटू
वेदांत, पाकी, अरुण जलद जलतरणपटू
बेळगाव : महाराष्ट्र विजयदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर अॅक्वेटिक संघटना आयोजित खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व एक्वेरियस क्लबचे जलतरणपटू वेदांत मिसाळे, पाकी हलगेकर, व अरुण जाधव यांना स्पर्धेतील जलद जलतरणपटूचा बहुमान मिळवला आहे. त्यामध्ये वेदांत मिसाळाने गट दोनमध्ये 2 कि.मी. जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक, पाकी हलगेकरने गट एक मध्ये एक कि.मी. जलतरण स्पर्धेत […]