वाशी : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिका क विभाग वाशी (vashi) परिसरातील C1 (धोकादायक आणि निर्जन) श्रेणीत घोषित केलेल्या इमारतींचा (high risk buildings) पाणीपुरवठा (water supply) खंडित करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशावरून व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.साई दर्शन को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक 26, सेक्टर-14, वाशी येथील 16 फ्लॅटचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासोबतच वाशी येथील सेक्टर-9 येथील ब्लॉक क्रमांक 3 मधील सुवर्ण सागर (VS II) टाईप ओनर्स असोसिएशनमधील 64 फ्लॅटचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. तसेच सी-2/1 ते सी-2/10, सेक्टर-16, वाशी येथील 160 फ्लॅटचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.हेही वाचाआता मुंबईहून कुवेतपर्यंत थेट विमानसेवा सुरूमराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधानांनी घ्यावा : उद्धव ठाकरे
Home महत्वाची बातमी वाशी : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा बंद
वाशी : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिका क विभाग वाशी (vashi) परिसरातील C1 (धोकादायक आणि निर्जन) श्रेणीत घोषित केलेल्या इमारतींचा (high risk buildings) पाणीपुरवठा (water supply) खंडित करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशावरून व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
साई दर्शन को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक 26, सेक्टर-14, वाशी येथील 16 फ्लॅटचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासोबतच वाशी येथील सेक्टर-9 येथील ब्लॉक क्रमांक 3 मधील सुवर्ण सागर (VS II) टाईप ओनर्स असोसिएशनमधील 64 फ्लॅटचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
तसेच सी-2/1 ते सी-2/10, सेक्टर-16, वाशी येथील 160 फ्लॅटचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.हेही वाचा
आता मुंबईहून कुवेतपर्यंत थेट विमानसेवा सुरू
मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधानांनी घ्यावा : उद्धव ठाकरे