श्रीराम बिल्डर्स-डेव्हलपर्सतर्फे विविध सामाजिक उपक्रम
बेळगाव : गेल्या वर्षी मर्यादित पाऊस झाल्याने यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे संकट उभे राहिले आहे. याची दखल घेत ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय श्रीराम बिल्डर्स व डेव्हलपर्सचे संचालक गोविंद टक्केकर यांनी घेतला आहे. सुळगा, देसूर, राजहंसगड, यरमाळ या चार गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. गोविंद टक्केकर यांचे काका अर्जुन टक्केकर, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील, राजू बांदिवडेकर, आनंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गोविंद टक्केकर यांनी भविष्यात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. याविषयी माहिती देताना ते म्हणाले, आजोबा मल्लाप्पा टक्केकर यांना मला मल्ल बनविण्याची इच्छा होती. मात्र, परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही. परंतु, आजोबांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या कार्यालयाला सहकार्य करीत आहे. प्रत्येक वर्षी बेळगावमध्ये कुस्त्यांची दंगल भरविण्यासाठी आर्थिक साहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावळाराम मेस्त्राr म्हणून ओळखले जाणारे माझे वडील रामचंद्र टक्केकर यांच्या बांधकाम व्यवसायाला पुढे नेत आहे. पूर्वीपासूनच सामाजिक कार्याची आवड होती. जायंट्स मेनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. अनेक सामाजिक उपक्रम, मंदिरांना आर्थिक साहाय्य केले. स्वमालकीच्या जागेत सुळगे गावी वृद्धाश्रम सुरू करणार आहे. गावात सेंद्रिय शेतीवर भर देऊन काम केले जात आहे. सुळगे येथील शेतामध्ये कूपनलिका खोदून टाकीद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जाणार आहे. आसपासच्या देसूर, राजहंसगड, यरमाळ या गावांनाही मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. याबरोबरच इतर उपक्रमही राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी श्रीराम बिल्डर्स-डेव्हलपर्सतर्फे विविध सामाजिक उपक्रम
श्रीराम बिल्डर्स-डेव्हलपर्सतर्फे विविध सामाजिक उपक्रम
बेळगाव : गेल्या वर्षी मर्यादित पाऊस झाल्याने यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे संकट उभे राहिले आहे. याची दखल घेत ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय श्रीराम बिल्डर्स व डेव्हलपर्सचे संचालक गोविंद टक्केकर यांनी घेतला आहे. सुळगा, देसूर, राजहंसगड, यरमाळ या चार गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. गोविंद टक्केकर यांचे काका अर्जुन […]