श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे विविध सामाजिक उपक्रम

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान आयोजित उमेश कुऱ्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त व कै. अभी पुजारी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरीब, गरजू लोकांना विविध साहित्य व शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी सहभाग दर्शविला. अनगोळ येथील मनपाच्या कर्मचाऱ्यांना घरगुती साहित्याचे वाटप […]

श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे विविध सामाजिक उपक्रम

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान आयोजित उमेश कुऱ्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त व कै. अभी पुजारी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरीब, गरजू लोकांना विविध साहित्य व शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी सहभाग दर्शविला. अनगोळ येथील मनपाच्या कर्मचाऱ्यांना घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबरोबर अनगोळ येथील शाळा क्र. 6, शाळा क्र. 34, शाळा क्र. 18 त्याचबरोबर चिदंबरनगर, भाग्यनगर शाळा आणि दिलीप दामले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येळ्ळूर चांगळेश्वरी हायस्कूलला टेबलचे वितरण केले. नंदन मक्कळधाम अनाथाश्रम व आनंदयात्री वृद्धाश्रमाला भोजनाची व्यवस्था करण्यात आली. काकती येथील गो-शाळेला चारा देण्यात आला. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.