रोणापाल मडुरे तिठा हनुमान मंदिरात २२ व २३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी
बांदा
अयोध्येत सोमवार २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रोणापाल मडूरा तिठा येथील दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी श्री हनुमंताची पुजाअर्चा होईल. सकाळी ९ वाजता श्री सत्य हनुमान महापूजा होईल. दुपारी प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताच्या वेळी घंटानाद व श्रीरामनामाचा जयजयकार होईल. दुपारी आरती झाल्यानंतर तीर्थप्रसादास सुरुवात होईल. सायंकाळी श्री रामनामाचा जप व स्थानिकांची भजने होतील. दिवाळीच्या स्वरुपात हा उत्सव साजरा करण्याचे श्री हनुमान देवस्थान समितीने निश्चित केले आहे.मंगळवार २३ रोजी सकाळी उत्तरपूजा होईल. सकाळी ९ वाजता श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री हनुमान देवस्थान समिती मार्फत करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी रोणापाल मडुरे तिठा हनुमान मंदिरात २२ व २३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम
रोणापाल मडुरे तिठा हनुमान मंदिरात २२ व २३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी बांदा अयोध्येत सोमवार २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रोणापाल मडूरा तिठा येथील दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी श्री हनुमंताची पुजाअर्चा होईल. सकाळी ९ वाजता श्री सत्य हनुमान महापूजा होईल. दुपारी प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताच्या वेळी घंटानाद व श्रीरामनामाचा जयजयकार होईल. दुपारी आरती झाल्यानंतर तीर्थप्रसादास सुरुवात […]