कारिवडे – शाळा नं १ शतक महोत्सवी वर्षानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

ओटवणे प्रतिनिधी | कारिवडे प्राथमिक शाळा नं १ च्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्या निमित्त मंगळवारी २ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री १०८ महंत मठाधिश प पू सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी जिल्हा […]

कारिवडे – शाळा नं १ शतक महोत्सवी वर्षानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

ओटवणे प्रतिनिधी | कारिवडे प्राथमिक शाळा नं १ च्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्या निमित्त मंगळवारी २ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री १०८ महंत मठाधिश प पू सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालक महेश सारंग तर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, सरपंच आरती माळकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुंबई स्थित उद्योजक दशरथ पोकळे, माजी सरपंच लक्ष्मण सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता आरती व तिर्थप्रसाद त्यानंतर भजन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता स्मरणिका प्रकाशन सोहळा, सायंकाळी ७ वाजता ह. भ .प कु अनुजा संदीप सावंत हिचे सुश्राव्य किर्तन, रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्र प्रमुख रामचंद्र वालावलकर,
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकिता पास्ते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश गावकर, उपाध्यक्ष सुहास गावकर ग्रामस्थांनी केले आहे.