कोल्हापुरातून आज पहिली ‘वंदे भारत’ धावणार! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार

कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापुरातून सोमवारी पहिली वंदे भारत ट्रेन धावणार आहे. गुजरातमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर कोल्हापुरातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ रेल्वेस सुऊवात होणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार […]

कोल्हापुरातून आज पहिली ‘वंदे भारत’ धावणार! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापुरातून सोमवारी पहिली वंदे भारत ट्रेन धावणार आहे. गुजरातमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर कोल्हापुरातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ रेल्वेस सुऊवात होणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’सह देशभरात 7 वंदे भारत रेल्वे सोमवारपासून सुरू होत आहेत. कोल्हापूर-पूणे वंदे भारतची शनिवारी यशस्वी चाचणी झाली असून सोमवारी सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी पहिली कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ रेल्वे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरू होणार आहे. गुरूवारपासून ही रेल्वे नियमित सकाळी सव्वाआठ वाजता सुटणार आहे. यामुळे कोल्हापूर ते पुणे रेल्वेचा प्रवास आता सुखकर व जलद होणार आहे.