सिंधुदुर्गातील रिक्त पदे महिन्याभरात भरणार !

कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप मानेंची माहिती सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला भडसावणाऱ्या रिक्त पदांची भरती येत्या महिन्याभरात करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत असे कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी आज येथे स्पष्ट केले.डाॅ. माने यांनी आज सकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयालास सकाळी भेट […]

सिंधुदुर्गातील रिक्त पदे महिन्याभरात भरणार !

कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप मानेंची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला भडसावणाऱ्या रिक्त पदांची भरती येत्या महिन्याभरात करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत असे कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी आज येथे स्पष्ट केले.डाॅ. माने यांनी आज सकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयालास सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्तपदांबद्दल विचारलं असता, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच पद भरती प्रक्रिया होणार आहे. या महिना अखेरपर्यंत सर्व रिक्तपद भरण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी देखील चांगली सेवा देत आहेत. काही अडचणी आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. लवकरच त्याही दुर होतील. नर्सचा अभाव लक्षात घेता‌ 16 स्टाफ नर्सना जिल्ह्यात हजर होण्याचे आदेश आपण काढले आहेत. तर वैद्यकीय अधिकारी व इतर जिल्हास्तरावरील भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्य स्तरावरील स्पेशालिस्ट डॉक्टरची भरती देखील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच होईल. चांगल्या सुविधा आपणास येथून मिळणार आहेत. क्लरीकल व इतर रिक्तपदेही भरली जाणार आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व रिक्तपद भरण्याचा आपला प्रयत्न आहे . डाॅ. माने यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु, कॅझ्युअल्टी, प्रसुती विभागासह रूग्णालय परिसराची पहाणी केली. रूग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची देखील त्यांनी विचारपूस करत सेवेबद्दलची माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. मुरली चव्हाण यांसह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व स्टाफ उपस्थित होते.