उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : आज बारावा दिवस, रात्रीपर्यंत ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. बोगद्यात मजूर अडकल्याच्या घटनेचा आज 12 वा दिवस आहे.

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : आज बारावा दिवस, रात्रीपर्यंत ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता

Uttarkashi Tunnel Tragedy  उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. बोगद्यात मजूर अडकल्याच्या घटनेचा आज 12 वा दिवस आहे.

 

ऑगर मशीनचे ऑपरेटर नौशाद अली ड्रिलिंगच्या कामात गुंतले आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, बोगद्याच्या आत ड्रिलिंगचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे.

 

यापूर्वी ड्रिलिंगच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉड आणि पाईपच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळेमदतकार्यावर परिणाम झाला.

 

मात्र कामगारांना लोखंडी रॉड कापण्यात यश आल्याचे नौशाद अली यांनी सांगितले. ड्रिलिंगचं काम लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

ते म्हणाले, “फक्त 20 टक्के ड्रिलिंगचं काम बाकी आहे आणि आशा आहे की आम्ही ते लवकरच पूर्ण करू.”

 

एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल म्हणाले की, “आणखी 2 पाईप टाकावे लागतील,तीनही लागतील. प्रार्थना करा की रात्री आमच्या इथलं ऑपरेशन्स पूर्ण होईल”

 

“ऑगर मशीनने तिथं काम सुरू केलं आहे. गर्डर काढण्यात आला आहे. आम्ही ड्रिलिंग सुरू केलं आहे. अडथळा पार केल्यानंतर पहिला पाईप टाकण्यात आला. दुसरा पाईपशी वेल्डिंग करुन जोडला जात आहे.नंतर ते आत ढकलले जातील. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यात कोणती त्रुटी राहू नये, म्हणून या कामासाठी आम्ही दीड ते दोन तास इतका वेळ घेतोय.”

 

आम्ही 60 मीटर पेक्षा अधिकच नियोजन केलं पाहिजे. आम्ही आता 48 मीटर अंतरापर्यंत पोहचलोय.

 

“तसं पाहता आज रात्रीपर्यंत बोगद्याच्या आत आपण पोहोचलं पाहिजे, पण मार्गात अडथळे आल्याने अधिक वेळ जरी लागला तरी त्याचीही तयारी असली पाहिजे.”

 

ते पुढे सांगतात की, “आमची टीम आत बोगद्यात जाईल, आम्ही आत स्ट्रेचर पाठवू. इथे अडकेलेले मजुर स्ट्रेचरवर झोपतील आणि आम्ही स्ट्रेचरला दोरी बांधून त्यांना बाहेर काढू.”

 

गढवाल विभागाचे आयजी केएस नागन्याल यांनी सांगितलं की, “आम्ही अॅम्ब्युलन्सची सर्व व्यवस्था केली आहे.आम्ही त्यांना (अडकलेल्या मजुरांना) घटनास्थळावरुन हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवू. बोगद्यात अडकलेल्यांची प्रकृती गंभीर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना एअरलिफ्ट देखील करू शकतो. . त्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय उपचाराची गरज असल्यास त्यांना ऋषिकेशच्या एम्समध्ये नेलं जाईल.”

 

पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे आज सकाळी ( 23 नोव्हेंबर) सिलक्यारा बोगद्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

 

भास्कर खुल्बे बीबीसीशी बोलताना म्हणाले, “बुधवारी 22 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही 45 मीटर आतपर्यंत पोहोचलो होतो. त्यापुढे जाण्याचा आज प्रयत्न असेल. रात्री ड्रिलिंग करताना ढिगाऱ्यात सळ्या आल्यामुळे थोडा अडथळा आला. मात्र सलग 6 तास प्रयत्न केल्यावर त्या नीट कापून बाहेर काढल्या.”

 

ते म्हणाले, “आता वेल्डिंग प्रक्रिया सुरू आहे. यात आधीच ड्रिल केलेल्या 45 मीटर पाइपला 6 मीटर पाइप जोडली जाईल आणि त्यानंतर ऑगरने ती पुश केली जाईल. जी आवश्यक काळजी घेणं आहे ती घेतली जात आहे. इथं तज्ज्ञांची आणखी एक टीम आली आहे. ही टीम व्हायब्रेशन्सची नोंद घेईल आणि सुरक्षा मापदंड कोणत्या मर्यादेपर्यंत पाळले जात आहेत हे ते सांगतील. आदल्या रात्री कटिंग सुरू असताना त्याची जाणिन होतेय असं मजुरांनी आतून सांगितलं कारण कटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसमुळे धूर होतो.दुसऱ्या बाजूला असलेल्या म्हणजे आतमध्ये अडकलेल्या मजुरांना त्याची जाणिव झाली.आता आम्ही जवळपर्यंत आलो आहोत याची जाणिव झाल्याचं मजुरांनी पाईपमधून सांगितलं.”

 

तज्ज्ञांना पाचारण

बोगद्यातील ढिगाऱ्यात ड्रिल करत असलेले बचाव कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहेत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य गिरीश सिंह रावत म्हणाले की, “रेस्क्यू ऑपरेशन जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे, मला आशा आहे की 1-2 तासात निकाल येईल.कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे.ढिगाऱ्यात अडकलेले स्टीलचे तुकडे कापून काढण्यात आले आहेत. पाईपलाईन ड्रिलिंगमध्ये उद्भवलेली समस्या सोडवली गेली आहे.पाइपलाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगद्यात मध्ये वीज पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय.”

 

सिलक्यारा बोगदा पीआरओनं सांगितलं की ढिगाऱ्यात धातूचे मोठे गज होते जे कापणं अवघड कार्य होतं. छोटे धातूचे तुकडे ते कापू शकतात. पण धातूचे मोठे गज कापण्यासाठी त्यांना जड यंत्रांची आवश्यकता आहे.ते आत ढिगाऱ्यातून काढणं आवश्यक आहे. काम लवकर सुरू व्हायला हवं.

 

वेल्डिंगतज्ज्ञांना दिल्लीहून सिलक्यारा बोगद्याच्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे जेथे अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

 

बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय

उत्तरकाशी इथं घडलेल्या घटनेनंतर देशात सुरू असलेल्या 2 डझनांपेक्षा जास्त बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी देशातल्या 29 बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

हे ऑडिट एनएचएआयसह दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे अधिकारी करतील. या दोन्ही संस्थांनी एकत्रित काम करुन एका आठवड्याच्या आत अहवाल द्यावेत असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

 

यातले 12 बोगदे हिमाचल प्रदेशात, 6 जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि बाकीचे उत्तराखंड आणि इतर राज्यांत आहेत.

 

बुधवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्यांना खात्री आहे की गुरुवारी दुपारपर्यंत कामगारांची सुटका केली जाईल.

 

12 नोव्हेंबर रोजी कामगार बोगदा बांधत असताना भूस्खलनामुळे त्याचा काही भाग कोसळला होता.

 

अधिकाऱ्यांनी काही तासांतच या बोगद्यात अडकलेल्या कर्माचाऱ्यांशी संपर्क स्थापित केला होता.

 

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन,अन्नपदार्थ आणि पाणी पोहचवण्यात आलं. याप्रकरणी अधिकारी नियमित अपडेट देत असून बचाव कार्य अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

पण मजुरांचे कुटुंब आणि मित्र चिंताग्रस्त आणि संतप्त झाले आहेत. मजुरांना काढण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे असा प्रश्न त्यांना पडलाय

 

सोमवारी(20 नोव्हेंबर) एंडोस्कोपिक कॅमेरा नवीन पाईपमध्ये टाकून मजुरांचा पहिला व्हीडिओ मिळाला होता. अधिकाऱ्यांनी त्यांना कॅमेऱ्यासमोर स्वतःची ओळख पटवण्यास सांगितलं आणि लवकरच त्यांची सुटका केली जाईल असं आश्वासन दिलं. मदत करणारे कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.

 

नवीन पाईप रुंद आहे आणि अधिकारी म्हणतात की ते आता अधिक ऑक्सिजन, अन्न आणि औषधे, मोबाईल फोन आणि चार्जर यांसारख्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा करता आला.

 

मंगळवारी ( 21 नोव्हेंबर) तब्बल 10 दिवसांनी कामगारांना पहिलं गरम जेवण पोहचवण्यात आलं. डाळ तांदुळाची खिचडी पॅक करून त्यांना गरम जेवण बोगद्याच्या आत पाठण्यात आलं.

 

मजुरांच्या बचावासाठी चिन्यासौर मध्ये एक कम्युनिटी सेंटरमध्ये मजुरांसाठी एक तात्पुरतं रुग्णालय स्थापन करण्याचं काम वेगानं सुरू आहे.

 

बोगद्यात एनडीआरएफची टीम ऑक्सिजन सिलिंडर सकट आहे आणि बाहेर अनेक अँम्ब्युलन्स उभ्या आहेत.

 

काल (22 नोव्हेंबर) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारासच्या अपडेटनुसार 12 मीटर ड्रिलिंगचं काम अद्याप बाकी आहे.

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. बोगद्यात मजूर अडकल्याच्या घटनेचा आज 12 वा दिवस आहे.

Go to Source