उत्तरकाशी बोगदा बचावकार्य: 41 मजुरांची सुखरुप सुटका, 12 नोव्हेंबरपासून काय काय घडलं?

उत्तरकाशीमधल्या बचावकार्याचा संपूर्ण आढावा- 12 नोव्हेंबर बोगद्याचा काही भाग कोसळला आणि 41 मजूर त्यामध्ये अडकले. 13 नोव्हेंबर या मजुरांशी संपर्क झाला आणि त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला.

उत्तरकाशी बोगदा बचावकार्य: 41 मजुरांची सुखरुप सुटका, 12 नोव्हेंबरपासून काय काय घडलं?

ANI

उत्तरकाशीमधल्या बचावकार्याचा संपूर्ण आढावा-

12 नोव्हेंबर

 

बोगद्याचा काही भाग कोसळला आणि 41 मजूर त्यामध्ये अडकले.

 

13 नोव्हेंबर

 

या मजुरांशी संपर्क झाला आणि त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला.

 

14 नोव्हेंबर

 

ढिगाऱ्याच्या आत 800-900 मिमी व्यासाचे स्टील पाईप ऑगर मशीनद्वारे टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सतत ढिगारा खाली पडत असल्याने दोन कामगार किरकोळ जखमीही झाले. यादरम्यान अन्न, पाणी, ऑक्सिजन, वीज आणि औषधं मजुरांपर्यंत पोहोचत राहिली.

 

15 नोव्हेंबर

 

ऑगर मशीनबद्दल पूर्णपणे समाधानी नसल्यामुळे, NHIDCL ने दिल्लीहून एअरलिफ्ट केलेल्या नवीन अत्याधुनिक ऑगर मशीनची मागणी केली.

 

16 नोव्हेंबर

 

नवीन ड्रिलिंग मशीनने खोदकाम सुरु केलं गेलं.

 

17 नोव्हेंबर

 

मात्र यातही काही अडथळे आल्याने इंदूरहून दुसरं ऑगर मशीन मागवण्यात आलं. पण नंतर काम थांबवावं लागलं.

 

18 नोव्हेंबर

 

पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि तज्ज्ञांनी नव्या योजनेवर काम सुरू करण्याचे आदेश दिले

 

19 नोव्हेंबर

 

ड्रिलिंग थांबलं आणि यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला.

 

20 नोव्हेंबर

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर चर्चा करून बचाव कार्याचा आढावा घेतला.

 

21 नोव्हेंबर

 

कामगारांचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला.

 

22 नोव्हेंबर

 

800 मिमी जाडीचा स्टील पाईप सुमारे 45 मीटरपर्यंत पोहोचला. मात्र त्यादिवशी सायंकाळी ड्रिलिंगमध्ये काही अडथळे निर्माण झाले.

 

23 नोव्हेंबर

 

मशीनला तडा गेल्याने पुन्हा ड्रिलिंग थांबवावं लागलं.

 

24 नोव्हेंबर

 

शुक्रवारी पुन्हा खोदकाम सुरू झाले पण नंतर तेही थांबवावं लागलं. ऑगर मशीन तुटल्याने तिला कापून बाहेर काढावं लागलं.

 

25 नोव्हेंबर

 

दरम्यान मॅन्युअल ड्रिलिंग (हाताने खोदकाम) सुरु केलं गेलं.

 

26 नोव्हेंबर

 

सिल्क्यारा-बारकोट बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभे खोदकाम (व्हर्टिकल ड्रिलिंग) सुरु केले गेले.

 

27 नोव्हेंबर

 

व्हर्टिकल ड्रिलिंग सुरूच होतं.

 

28 नोव्हेंबर

 

दुपारी बचाव पथक कामगारांपर्यंत पोहोचलं आणि बोगद्यात पाईप टाकण्याचं काम पूर्ण झालं. यानंतर कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. अखेर सगळ्या कामगारांची सुटका झाली.

 

उत्तरकाशी बोगद्यातील 41 मजुरांच्या सुटकेनंतर सर्वांवर आता आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. 17 दिवसांनंतर मजुरांची सुटका झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

 

बिहारमधील आरा येथील एका मजुराच्या नातेवाईकानं पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या वेदना आणि आनंद असा दोन्ही भावना व्यक्त केल्या.

 

ते म्हणाले, “हा आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण देश प्रार्थना करत होता आणि ती प्रार्थना यशस्वी झाली. हा आनंद शब्दांत मांडता येणार नाही. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या वृत्तांमध्ये या मजुरांचे कुटुंबीय आनंद साजरा करताना दिसत आहेत.

उत्तरकाशीमधल्या बचावकार्याचा संपूर्ण आढावा-
12 नोव्हेंबर

बोगद्याचा काही भाग कोसळला आणि 41 मजूर त्यामध्ये अडकले.

13 नोव्हेंबर

या मजुरांशी संपर्क झाला आणि त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला.

Go to Source