Uttarakhand: रुरकी येथे भीषण अपघात, वीटभट्टीची भिंत कोसळून पाच मजुरांचा मृत्यू

उत्तराखंडमधील रुरकी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मंगळूर कोतवालीच्या लहाबोली गावात वीटभट्टीची भिंत अचानक कोसळली. यावेळी ढिगाऱ्याखाली अर्धा डझनहून अधिक मजूर गाडले गेले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर तिघांची …

Uttarakhand: रुरकी येथे भीषण अपघात, वीटभट्टीची भिंत कोसळून पाच मजुरांचा मृत्यू

उत्तराखंडमधील रुरकी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मंगळूर कोतवालीच्या लहाबोली गावात वीटभट्टीची भिंत अचानक कोसळली. यावेळी ढिगाऱ्याखाली अर्धा डझनहून अधिक मजूर गाडले गेले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे

 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी विटा भाजण्यासाठी चिमणीत विटा भरत असताना हा अपघात झाला. कामगार काम करत असताना अचानक भिंत कोसळली. कोणाला काही समजण्यापूर्वीच भिंतीजवळ उभे असलेले कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

 

सध्या जेसीबीच्या सहाय्याने डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. एसपी देहाट यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मंगळूर पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रदीप बिश्त यांनी सांगितले की, आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन मजूर लहाबोली गावातील, एक मजूर मुझफ्फरनगरचा तर दुसरा स्थानिक गावातील होता.

Edited By- Priya DIxit  

 

 

 

Go to Source