1 मार्चपासून युटीएस ॲप बंद होणार
मुंबईकर गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी UTS App चा वापर करत आहेत. यावरून लोकल तिकिट, पास आणि अनारक्षित तिकिट बुक करणं सुद्धा अगदी सोपं होतं. पण 1 मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे. सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे आणि काही दिवसांत सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता तिकिट कसं काढायचं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.भारतीय रेल्वेने UTS (Unreserved Ticketing System) ॲप 27 डिसेंबर 2014 मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आला. मुंबई (mumbai) लोकलचं (mumbai local) तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. पण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना RailOne कडे वळावे लागणार आहे. एक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता 1 मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै 2025 मध्ये RailOne ची सुरुवात केली होती. ‘सेंटर ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम’ च्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त हे सुरु करण्यात आलं होतं. रेल वनवरून सुरुवातीला आरक्षित तिकिट बुकिंग सुरु करण्यात आलं होतं. लांब पल्ल्यांच्या ट्रेन तिकिटांसाठी हा एक उत्तम पर्याय होता. आता या ॲपवरून प्रवाशांना आरक्षित आणि अनारक्षित असे दोन्ही प्रकारची तिकिटं काढणं सोपं होणार आहे. अनेक वेगवेगळे ॲप वापरण्याऐवजी आता सर्व प्रकारचे तिकीट एकाच ठिकाणी बुक करता येणार आहेत.ऐन वेळी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आतापासूनच रेलवन चा वापर सुरु करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. UTS च्या R-Wallet मध्ये उपलब्ध असलेले प्रवाशांचे पैसे सुरक्षितपणे त्यांच्या रेल वनच्या अकाऊंटमध्ये स्थलांतरित करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. रेल वनचा वापर करून मुंबईकर आता UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगसह R-Wallet द्वारे तिकिट काढू शकतील.या नव्या RailOne ॲपवर तिकिट बुकींगसह आणखी पर्याय उपलब्ध आहेत. ट्रेनचं लाईव्ह लोकेशन, कोणती ट्रेन विलंबाने धावते आहे, कोचची स्थिती, प्लॅटफॉर्मबद्दल माहिती, तिकिट रद्द करणे तसचं PNR ट्रॅक करणं ही सोपं होणार आहे. या ॲपच्या RailMadadद्वारे प्रवासी तक्रारीही नोंदवू शकतात. इतकंच नव्हे आयआरसीटीसीच्या अधिकृत विक्रेत्यांकडून प्रवासादरम्यान जेवणसुद्धा ऑर्डर करता येणार आहे.हेही वाचामहाराष्ट्रात नव्या रेल्वे प्रकल्पाची घोषणामुंबई महानगर प्रदेशात ‘पॉड टॅक्सी’साठी नगरपालिकांनी आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Home महत्वाची बातमी 1 मार्चपासून युटीएस ॲप बंद होणार
1 मार्चपासून युटीएस ॲप बंद होणार
मुंबईकर गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी UTS App चा वापर करत आहेत. यावरून लोकल तिकिट, पास आणि अनारक्षित तिकिट बुक करणं सुद्धा अगदी सोपं होतं. पण 1 मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे.
सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे आणि काही दिवसांत सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता तिकिट कसं काढायचं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
भारतीय रेल्वेने UTS (Unreserved Ticketing System) ॲप 27 डिसेंबर 2014 मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आला.
मुंबई (mumbai) लोकलचं (mumbai local) तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. पण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना RailOne कडे वळावे लागणार आहे.
एक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता 1 मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै 2025 मध्ये RailOne ची सुरुवात केली होती. ‘सेंटर ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम’ च्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त हे सुरु करण्यात आलं होतं.
रेल वनवरून सुरुवातीला आरक्षित तिकिट बुकिंग सुरु करण्यात आलं होतं. लांब पल्ल्यांच्या ट्रेन तिकिटांसाठी हा एक उत्तम पर्याय होता.
आता या ॲपवरून प्रवाशांना आरक्षित आणि अनारक्षित असे दोन्ही प्रकारची तिकिटं काढणं सोपं होणार आहे. अनेक वेगवेगळे ॲप वापरण्याऐवजी आता सर्व प्रकारचे तिकीट एकाच ठिकाणी बुक करता येणार आहेत.
ऐन वेळी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आतापासूनच रेलवन चा वापर सुरु करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
UTS च्या R-Wallet मध्ये उपलब्ध असलेले प्रवाशांचे पैसे सुरक्षितपणे त्यांच्या रेल वनच्या अकाऊंटमध्ये स्थलांतरित करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
रेल वनचा वापर करून मुंबईकर आता UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगसह R-Wallet द्वारे तिकिट काढू शकतील.
या नव्या RailOne ॲपवर तिकिट बुकींगसह आणखी पर्याय उपलब्ध आहेत. ट्रेनचं लाईव्ह लोकेशन, कोणती ट्रेन विलंबाने धावते आहे, कोचची स्थिती, प्लॅटफॉर्मबद्दल माहिती, तिकिट रद्द करणे तसचं PNR ट्रॅक करणं ही सोपं होणार आहे.
या ॲपच्या RailMadadद्वारे प्रवासी तक्रारीही नोंदवू शकतात. इतकंच नव्हे आयआरसीटीसीच्या अधिकृत विक्रेत्यांकडून प्रवासादरम्यान जेवणसुद्धा ऑर्डर करता येणार आहे.हेही वाचा
महाराष्ट्रात नव्या रेल्वे प्रकल्पाची घोषणा
मुंबई महानगर प्रदेशात ‘पॉड टॅक्सी’साठी नगरपालिकांनी आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
