कसूर’मध्ये दिसणार उर्वशी
आफताब शिवदासानीसोबत मुख्य भूमिकेत
अभिनेता आफताब शिवदासानी दीर्घकाळानंतर एका रोमँटिक, हॉरर-ड्रामासोबत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘कसूर’ आहे. आफताब यापूर्वी 2019 मध्ये सेंटर या चित्रपटात दिसून आला होता. कसूर या चित्रपटात उर्वशी रौतेला ही मुख्य भूमिकेत असणार आहे.
उर्वशी रौतेलाच्या या चित्रपटाचे सध्या उत्तराखंडमध्ये चित्रिकरण सुरू आहे. कसूर हा चित्रपट एक भयपट असून त्यात तीन मुख्य पात्रं असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन ग्लेन बॅरेटो यांनी केले आहे. तर मुदस्सर अजीज यांनी याची कहाणी लिहिली आहे. बबलू अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
आफताब आणि उर्वशी यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी प्रदर्शित होणार आहे. 2021 मध्ये प्रदर्शित ‘कसूर’ या चित्रपटातही आफताबने मुख्य भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात त्याच्यासोबत लिसा रे, इरफान खान, आशुतोष राणा आणि अन्य कलाकार दिसून आले होते.
तर उर्वशी अलिकडेच जेएनयू या चित्रपटात दिसून आली आहे. यात तिच्यासोबत पीयूष मिश्रा, रवि किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मि देसाई, अतुल पांडे आणि शिवज्योति राजपूत हे कलाकार दिसून आले होते.
Home महत्वाची बातमी कसूर’मध्ये दिसणार उर्वशी
कसूर’मध्ये दिसणार उर्वशी
आफताब शिवदासानीसोबत मुख्य भूमिकेत अभिनेता आफताब शिवदासानी दीर्घकाळानंतर एका रोमँटिक, हॉरर-ड्रामासोबत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘कसूर’ आहे. आफताब यापूर्वी 2019 मध्ये सेंटर या चित्रपटात दिसून आला होता. कसूर या चित्रपटात उर्वशी रौतेला ही मुख्य भूमिकेत असणार आहे. उर्वशी रौतेलाच्या या चित्रपटाचे सध्या उत्तराखंडमध्ये चित्रिकरण सुरू आहे. कसूर हा चित्रपट एक भयपट असून […]