कॅनडाला हरवून उरुग्वे तिसऱ्या स्थानी
अमेरिका फुटबॉल : पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 फरकाने विजय, सुआरेझ, रॉशेचे चमकदार प्रदर्शन
वृत्तसंस्था/ नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका
लुईस सुआरेझने इंज्युरी टाईममध्ये बरोबरीचा गोल केल्यानंतर उरुग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये कॅनडाचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टीचा अवलंब करण्यात आला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये उरुग्वेचा गोलरक्षक सर्जिओ रॉशेने उत्कृष्ट गोलरक्षण केले. त्याने कॅनडाच्या इस्माईल कोनेची पेनल्टी दुबळी पेनल्टी सहज थोपवली आणि अल्फोन्सो डेव्हिसचा फटका क्रॉसबारला लागल्याने उरुग्वेला 4-3 असा विजय मिळाला. जोनाथन डेव्हिडने 80 व्या मिनिटाला कॅनडाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली तेव्हा उरुग्वेवर संभाव्य पराभवाचे संकट आले होते. पण दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून उतरलेला बार्सिलोना व लिव्हरपूलचा माजी स्ट्रायकर लुईस सुआरेझने बरोबरीचा गोल नोंदवून उरुग्वेला
Home महत्वाची बातमी कॅनडाला हरवून उरुग्वे तिसऱ्या स्थानी
कॅनडाला हरवून उरुग्वे तिसऱ्या स्थानी
अमेरिका फुटबॉल : पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 फरकाने विजय, सुआरेझ, रॉशेचे चमकदार प्रदर्शन वृत्तसंस्था/ नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका लुईस सुआरेझने इंज्युरी टाईममध्ये बरोबरीचा गोल केल्यानंतर उरुग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये कॅनडाचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये उरुग्वेचा गोलरक्षक सर्जिओ रॉशेने […]