उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

उरण (uran) हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला बुधवारी पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 22 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी (murder) न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी (jail) सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपीवर एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कलमे देखील लावण्यात आली आहेत. कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून सेंट्रल युनिटने दाऊद शेख (24) याला अटक करण्यात आली. आरोपी पीडितेला 2019 पासून ओळखत होता. या आधी देखील आरोपीला एकदा अटक (arrest) करण्यात आली होती.  दाऊद आणि मुलीला तिच्या गार्डनमध्ये पाहिले. त्यानंतर वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात आरोपी काही महिने तुरुंगातही होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला. जिथे त्याने बस चालक म्हणून कामही केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला होता आणि त्यामुळे आरोपी दाऊद शेख चिडला होता. दरम्यान, ‘क्रूर’ हत्येबाबतच्या सोशल मीडियावरील पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्टीकरण झोन वनचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिले आहे. तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. “तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली आहे, डोके फुटले आहे, स्तन कापले गेले आहेत, हात कापले गेले आहेत, अशा पोस्ट सर्व दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत.” तसेच ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.हेही वाचा 3 वर्षांच्या विद्यार्थीनीचे शाळेतच लैंगिक शोषण अल्पवयीन मुलीचा बाळाला जन्म देताना मृत्यू

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

उरण (uran) हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला बुधवारी पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 22 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी (murder) न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी (jail) सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपीवर एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कलमे देखील लावण्यात आली आहेत.कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून सेंट्रल युनिटने दाऊद शेख (24) याला अटक करण्यात आली. आरोपी पीडितेला 2019 पासून ओळखत होता. या आधी देखील आरोपीला एकदा अटक (arrest) करण्यात आली होती. दाऊद आणि मुलीला तिच्या गार्डनमध्ये पाहिले. त्यानंतर वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात आरोपी काही महिने तुरुंगातही होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला. जिथे त्याने बस चालक म्हणून कामही केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला होता आणि त्यामुळे आरोपी दाऊद शेख चिडला होता.दरम्यान, ‘क्रूर’ हत्येबाबतच्या सोशल मीडियावरील पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्टीकरण झोन वनचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिले आहे. तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. “तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली आहे, डोके फुटले आहे, स्तन कापले गेले आहेत, हात कापले गेले आहेत, अशा पोस्ट सर्व दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत.” तसेच ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.हेही वाचा3 वर्षांच्या विद्यार्थीनीचे शाळेतच लैंगिक शोषणअल्पवयीन मुलीचा बाळाला जन्म देताना मृत्यू

Go to Source