लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण

बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. गणाधिश कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या चषकाच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य सोसायटीचे सभासद गजानन धामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, अभिजित दिक्षित, भोसले, बेळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, गोपाळ खांडे, लस्टर डिसोझा, अमित पाटील, प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, जॉर्ज रॉड्रिग्ज, मयुर कदम, विजय रेडेकर, अक्षय चव्हाण आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी गोपाळ खांडे यांचा खास सत्कार करण्यात आला. 40 वर्षे बेळगाव जिल्हा संघटनेच्या फुटबॉल स्पर्धा भरविण्यास त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आज मोठ्या दिमाखात उभी आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून बीडीएफएतर्फे शाल, श्रीफळ व रोख 25 हजार रुपये देऊन त्यांचा खास सन्मान करण्यात आला.

Home महत्वाची बातमी लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण
लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. गणाधिश कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या चषकाच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य सोसायटीचे सभासद गजानन धामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, अभिजित दिक्षित, भोसले, बेळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, गोपाळ खांडे, लस्टर डिसोझा, अमित पाटील, प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, जॉर्ज […]
