मुंबईसह महाराष्ट्रातही अवकाळी पाऊसाचा इशारा

मुंबईत येत्या एक दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत वातावरणही ढगाळ राहील त्यामुळे काहीसा उकाडा जाणवेल.कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशाच्या विविध भागांत उष्णतेची लाट कायम आहे. तरीही मुंबईसह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झालं आहे. काही ठिकाणी गारपीटसह मुसळधार पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र संपुष्टात आले असले तरी, राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत एक नवीन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरणार आहे.हेही वाचा पापलेट मासा नष्ट होण्याच्या उंबरठ्यावरमुंबई आणि नवी मुंबईत घरांच्या किमती प्रत्येकी 3% ने घसरल्या

मुंबईसह महाराष्ट्रातही अवकाळी पाऊसाचा इशारा

मुंबईत येत्या एक दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत वातावरणही ढगाळ राहील त्यामुळे काहीसा उकाडा जाणवेल.कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.देशाच्या विविध भागांत उष्णतेची लाट कायम आहे. तरीही मुंबईसह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झालं आहे. काही ठिकाणी गारपीटसह मुसळधार पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र संपुष्टात आले असले तरी, राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत एक नवीन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरणार आहे.हेही वाचापापलेट मासा नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर
मुंबई आणि नवी मुंबईत घरांच्या किमती प्रत्येकी 3% ने घसरल्या

Go to Source