सौहार्द परंपरा अभियानातून एकतेचा नारा

महात्मा गांधी हौतात्म्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अभियान बेळगाव : महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील विविध संघटनांकडून सौहार्द परंपरा अभियानाच्या माध्यमातून चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून एकतेचा नारा देण्यात आला. सर्वधर्म, सर्व जाती, सर्व भाषिक एक आहोत, असे सांगत एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. दि. 30 जानेवारी हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हुतात्मा […]

सौहार्द परंपरा अभियानातून एकतेचा नारा

महात्मा गांधी हौतात्म्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अभियान
बेळगाव : महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील विविध संघटनांकडून सौहार्द परंपरा अभियानाच्या माध्यमातून चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून एकतेचा नारा देण्यात आला. सर्वधर्म, सर्व जाती, सर्व भाषिक एक आहोत, असे सांगत एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. दि. 30 जानेवारी हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हुतात्मा दिवस म्हणून आचरण्यात येतो. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व जाती, धर्माच्या धर्म गुरुंच्या उपस्थितीमध्ये सौहार्द परंपरा अभियान राबविण्यात आले. देशामध्ये वाढत चाललेल्या जातीय दंगली, धार्मिक कारणांवरून होणारे वादविवाद यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठीच सर्वांनी एकमेकाला सहकार्य करत एकमेकांच्या सुख, दु:खात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे, असा संदेश यामाध्यमातून देण्यात आला आहे.
कन्नड साहित्य भवनमध्ये धर्मगुरुंच्या उपस्थितीत बैठक घेऊन एकतेचा संदेश देण्यात आला. जात, धर्म याच्यापेक्षा मानवता हा मोठा धर्म आहे, असे धर्मगुरुंकडून सांगण्यात आले. विविध धर्माचे अनेक सण आहेत. ते सण एकमेकाला सहकार्य करून साजरे करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले. वाढत चाललेल्या द्वेषाला मूठमाती देऊन एकतेचा नारा देण्यात आला. यावेळी ख्रिश्चन, मुस्लीम, हिंदू धर्मगुरुंसह सामाजिक कार्यकर्ते अॅड. नागेश सातेरी, कामगार नेते जैनेखान, मंदा नेवगी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी व महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या.