सीमावासियांची एकजूट हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली
रामलिंगखिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेने मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामध्ये 67 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. सीमाप्रश्नाचा लढा आजही सुरू आहे. त्यामुळे सीमावासियांची अभेद्य एकजूट हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी रामलिंगखिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, सीमावासियांच्या व्यथा या शिवसेनेला अधिक जवळून माहिती होत्या. त्यामुळेच सीमाप्रश्नाच्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना अग्रभागी राहिल्याचे त्यांनी सांगितले. अंकुश केसरकर म्हणाले, बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय झाला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात हे केवळ शिवसेनेमुळेच असे त्यांनी सांगितले. खानापूर म. ए. समितीचे मुरलीधर पाटील, धनंजय पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, श्रीकांत कदम, मनोहर हुंदरे, दिलीप बैलूरकर, रमेश माळवी, महेश टंकसाळी, दत्ता पाटील यासह शिवसेना व म. ए. समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सीमाप्रश्नाला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार
युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सीमाप्रश्नाला विरोध करणाऱ्या शिंदे सेनेच्या बेळगावमधील पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. ज्या एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नासाठी 40 दिवस तुरुंगवास भोगला. त्यांच्याच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी सीमाप्रश्नाला विरोध करतात ही शोकांतिका आहे. शिवसेना ही सुरुवातीपासून सीमाप्रश्नाच्या बाजूने आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना वेळीच समज देणे गरजेचे होते. परंतु त्याच पदाधिकाऱ्यांचा काही दिवसांपूर्वीच सोलापूर येथे सत्कार करण्यात आल्याने दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Home महत्वाची बातमी सीमावासियांची एकजूट हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली
सीमावासियांची एकजूट हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली
रामलिंगखिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेने मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामध्ये 67 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. सीमाप्रश्नाचा लढा आजही सुरू आहे. त्यामुळे सीमावासियांची अभेद्य एकजूट हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी […]
