Satara News : वावरहिरे गावात श्री पाणलिंग यात्रेची अद्वितीय परंपरा; गुलाल-भंडाऱ्याऐवजी पेढ्यांचे वाटप
वावरहिरे गावात श्री पाणलिंग यात्रेची अद्वितीय परंपरा;
शिखरशिंगणापूर -माण तालुक्यातील श्री क्षेत्र वावरहिरे येथे श्री पाणलिंगाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेचे खास आकर्षण म्हणजे पारंपरिक गुलाल-खोबरे-भंडाऱ्याऐवजी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे वाढून यात्रोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा जपली. वावरहिरे ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्यावतीने गावात धार्मिक, लोकप्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यान, कीर्तन भजन, मानसी पाटील पुणेकर यांचा नृत्याविष्कार, अघोरी देखाव्याचा नजराणा, वाघ्या-मुरळी पार्टीचा सेवापर कार्यक्रम तसेच भारुडी भजन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळाली. त्यामुळे गावात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. यात्रोत्सवासाठी हजारो भाविकांनी वावरहिरे येथे गर्दी केली होती. सायंकाळी श्री पाणलिंग देवाची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली.
भुजबळवस्तीमार्गे पुढे जात ओढापात्रातून पालखीगुलाल-भंडारा-खोबऱ्याऐवजी पेठ्यांचे वाटप यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दिवशी गुलाल, खोबरे किंवा भंडारा न उधळता, पर्यावरणपूरक आणि स्नेहभाव जपून एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. अनेक भाविकांनी नवस फेडत पेढ्यांचे वाटप केले. आनंद, आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही पेढ्यांची परंपरा यंदाच्या यात्रेचा मुख्य आकर्षणबिंदू ठरली.
गावातील श्री मारुती मंदिरात विसावली. भाविकांच्या दर्शनानंतर मध्यरात्रीनंतर प्रदक्षिणामार्गे पालखी सुतार नेट परिसरात दाखल झाली. ताल-सुरवाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ‘मानाच्या कावडी च्या उत्साहपूर्ण सहभागात पालखीचे स्वागत करण्यात आले.
यानंतर भारुडी भजनाच्या लोकप्रबोधनात्मक कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली. संपूर्ण यात्रोत्सव ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता यात्रा निर्विघ्न पार पडल्याने प्रशासनाकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
Home महत्वाची बातमी Satara News : वावरहिरे गावात श्री पाणलिंग यात्रेची अद्वितीय परंपरा; गुलाल-भंडाऱ्याऐवजी पेढ्यांचे वाटप
Satara News : वावरहिरे गावात श्री पाणलिंग यात्रेची अद्वितीय परंपरा; गुलाल-भंडाऱ्याऐवजी पेढ्यांचे वाटप
वावरहिरे गावात श्री पाणलिंग यात्रेची अद्वितीय परंपरा; शिखरशिंगणापूर -माण तालुक्यातील श्री क्षेत्र वावरहिरे येथे श्री पाणलिंगाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेचे खास आकर्षण म्हणजे पारंपरिक गुलाल-खोबरे-भंडाऱ्याऐवजी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे वाढून यात्रोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा जपली. वावरहिरे ग्रामस्थ व […]
