अनोखा घुबडांचा कॅफे
8 तास काम करतात घुबड
जगात वेगवेगळ्या जागा असून त्यांचे स्वत:चे असे वैशिष्ट्या आहे. सध्या एक कॅफे चर्चेत असून तेथे लोकांचे स्वागत करण्यासाठी माणूस नव्हे तर घुबड असतात. रिसेप्शनवर घुबडांची रांगच दिसून येते.
या कॅफेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. येथे घुबडांना काम करताना पाहून काही जणांना ही क्रूरता असल्याचे वाटते. हा कॅफे दरदिनी दुपारी 2 वाजता सुरू होतो आणि याचे कारण म्हणजे घुबडांना पूर्ण रात्र आणि सकाळपर्यंत आराम करण्याची संधी मिळावी. कॅफे बंद झाल्यावर या घुबडांना मुक्तपणे फिरण्यासाठी सोडले जाते.
या कॅफेचे नाव बूमाह असून तो जपानच्या आउल कॅफेमुळे प्रेरित होत निर्माण करण्यात आला आहे. इन्स्टाग्रमावर कंटेंट क्रिएटर लिटिल फूडीने कॅफेचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात अनेक घुबडं स्वत:चे नाव आणि टॅगसोबत दिसून येतात.
घुबडांच्या खोल्यांना काचेद्वारे विभागण्यात आले आहे. येथे येणारे लोक त्यांना दूरून पाहू शकतात. परंतु जर त्यांना जवळ जाण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा असल्यास अतिरिक्त दीड हजार रुपये खर्च करावे लागतात असे कॅफेचे मालक मोहम्मद अल शेही यांनी सांगितले आहे. या व्हिडिओला लोकांची मोठी पसंती मिळत असली तरीही त्यांना घुबडांच्या स्वातंत्र्याचीही चिंता आहे. मालकानुसार कॅफेतील बहुतांश घुबडं ही दिव्यांग असून ती जंगलात राहू शकत नाहीत. अशा स्थितीत येथे त्यांची देखभाल केली जाते.