अभिनव फाऊंडेशन तर्फे मतदानाबाबत अनोखी जनजागृती

ओटवणे प्रतिनिधी मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन या संस्थेच्या सदस्यांनी सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी असे फ्लेक्स बोर्ड लावण्याची मोहीम राबवली.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची मतदान प्रक्रिया मंगळवार ७ मे रोजी सकाळी ७ ते सायं ६ अश्या वेळेत पार […]

अभिनव फाऊंडेशन तर्फे मतदानाबाबत अनोखी जनजागृती

ओटवणे प्रतिनिधी
मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन या संस्थेच्या सदस्यांनी सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी असे फ्लेक्स बोर्ड लावण्याची मोहीम राबवली.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची मतदान प्रक्रिया मंगळवार ७ मे रोजी सकाळी ७ ते सायं ६ अश्या वेळेत पार पडणार आहे. सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पाडावे असे आवाहन अभिनव फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.अत्यंत मोजक्या शब्दांत मतदान जनजागृती करणारे हे फलक लक्षवेधी ठरत आहेत. यासाठी अभिनव फाऊंडेशनचे किशोर चिटणीस, राजू केळुसकर, अण्णा म्हापसेकर या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले असून येत्या विधानसभा निवडणुकी पूर्वी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान जनजागृती करणार असल्याचे अभिनव फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.