बेळगावच्या सायकलपटूंचे अनोखे साहस

बेळगाव-कन्याकुमारी 1200 कि.मी. प्रवास पूर्ण बेळगाव : बेळगाव ते कन्याकुमारी असा 1200 किलोमीटरहून अधिक प्रवास सायकलवरून पूर्ण करून बेळगावच्या अकरा सायकलपटूंनी एक अनोखे साहस पूर्ण केले. बेळगावमधील सर्वच सायकलपटूंसाठी तसेच बेळगावकरांसाठी ही निश्चितच भूषणावह बाब आहे. बेळगावच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी बेळगाव आणि कन्याकुमारी येथे असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रमाच्या पाठिंब्यावर हा खडतर प्रवास सुरू केला. […]

बेळगावच्या सायकलपटूंचे अनोखे साहस

बेळगाव-कन्याकुमारी 1200 कि.मी. प्रवास पूर्ण
बेळगाव : बेळगाव ते कन्याकुमारी असा 1200 किलोमीटरहून अधिक प्रवास सायकलवरून पूर्ण करून बेळगावच्या अकरा सायकलपटूंनी एक अनोखे साहस पूर्ण केले. बेळगावमधील सर्वच सायकलपटूंसाठी तसेच बेळगावकरांसाठी ही निश्चितच भूषणावह बाब आहे. बेळगावच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी बेळगाव आणि कन्याकुमारी येथे असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रमाच्या पाठिंब्यावर हा खडतर प्रवास सुरू केला. या मोहिमेने केवळ त्यांच्या शारीरिक क्षमतेचीच नव्हे तर सांघिक कार्याची आणि साहसाचीसुद्धा चुणूक दाखविली. या सायकलपटूंमध्ये रोहन हरगुडे, सचिन अष्टेकर, मनोज गावकर, धीरज भाटे, डॉ. अभिनंदन हंजी, डॉ. सतीश बागेवाडी, राजू नायक, चाणक्य गुंडप्पन्नवर, जसविंदरसिंग खुराणा, रमेश गोवेकर व राज चव्हाण यांचा सहभाग आहे. बेळगाव ते कन्याकुमारी हा 1200 हून अधिक किलोमीटर अंतराचा प्रवास तसा काही सोपा नव्हता. सायकलस्वारांसाठी तर तो अधिकच कठीण. वेगवेगळे उंच-सखल भूप्रदेश, हवामानात सातत्याने होणारे बदल व अन्य आव्हाने सायकलपटूंसाठी होती. कर्नाटकच्या उत्तरेकडील टोकापासून भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत या रायडर्सनी सायकलिंग करून आपले कर्तृत्व सिद्ध केले. या प्रवासामध्ये सायकलपटूंनी इतरांनासुद्धा अशा पद्धतीने सायकल चालविण्यासाठी आदर्श ठेवला आहे.