महाराष्ट्र वीज कर्मचारी आज संपावर, अधिकाऱ्यांच्या रजा रद्द
महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. सरकारने मेस्मा लागू करून संप बेकायदेशीर घोषित केला आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसांच्या संपादरम्यान अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी महावितरणने बुधवारी आपला आपत्कालीन आराखडा पूर्ण केला आणि राज्यभरात व्यवस्था तयार केली आहे.
तसेच, गंभीर कारणांसाठी घेतलेल्या वगळता सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहे. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
दरम्यान, व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा आणि आवाहन करूनही, संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने, नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (मेस्मा) लागू करून हा संप बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे.
ALSO READ: cough syrup महाराष्ट्रात कफ सिरपविरुद्ध कारवाई, मोठा साठा जप्त
संपादरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक किंवा खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पर्यायी व्यवस्था चोवीस तास उपलब्ध असतील. वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी किंवा चिंता असल्यास महावितरणने सर्वांना २४ तासांच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आणि संप काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
ALSO READ: Cough syrup case दिल्लीहून आरोग्य मंत्रालयाचे पथक नागपुरात दाखल, वैद्यकीय आणि एम्स रुग्णालयांची चौकशी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Medical Bill Corruption नागपुरात सीबीआयने आरोपींना अटक केली