केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आज-उद्या गोवा दौऱ्यावर
पणजी : केंद्रीय अवजड वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे आज गुरुवार दि. 11 जुलै रोजी गोव्यात येत असून सायंकाळी 5 वाजता ते मोपा विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या संलग्न (मोपा लिंक रोड) मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर ते मोपा विमानळापर्यंत जाणार असून तेथे उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 12 रोजी गडकरी ताळगाव येथे होणाऱ्या गोवा राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीत सहभागी होऊन मार्गदर्शन करतील. दक्षिण गोव्यात भाजपसाठी काम केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत समाविष्ट करून घेण्यात येणार असून त्यावेळी भाजप संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
Home महत्वाची बातमी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आज-उद्या गोवा दौऱ्यावर
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आज-उद्या गोवा दौऱ्यावर
पणजी : केंद्रीय अवजड वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे आज गुरुवार दि. 11 जुलै रोजी गोव्यात येत असून सायंकाळी 5 वाजता ते मोपा विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या संलग्न (मोपा लिंक रोड) मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर ते मोपा विमानळापर्यंत जाणार असून तेथे उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 12 रोजी […]