केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या बेळगावात

रिंगरोडच्या कामाचा होणार शुभारंभ बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुऊवारी दि. 22 फेब्रुवारी रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान रिंगरोडच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 1622.04 कोटी निधीमध्ये 34.48 कि.मी. लांबीचा रिंगरोड निर्माण करण्यात येणार आहे. गुरुवार दुपारी 12 वाजता येथील जिल्हा क्रीडांगणावर विविध विकासकामांचा कोनशिला […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या बेळगावात

रिंगरोडच्या कामाचा होणार शुभारंभ
बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुऊवारी दि. 22 फेब्रुवारी रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान रिंगरोडच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 1622.04 कोटी निधीमध्ये 34.48 कि.मी. लांबीचा रिंगरोड निर्माण करण्यात येणार आहे. गुरुवार दुपारी 12 वाजता येथील जिल्हा क्रीडांगणावर विविध विकासकामांचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार इराण्णा कडाडी यांनी दिली आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील कारवार, विजापूर, बागलकोट, कोप्पळ, रायचूर, कलबुर्गी, बिदर या जिल्ह्यांमधील रस्ते कामांचा विकास करण्यात येणार आहे. त्याबरोबरच अनेक विकासकामांना चालना देण्यात येणार आहे. उपरोक्त जिल्ह्यांमधील 376 कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी 6975 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग 548-बी चिकोडी बायपास ते गोटूरपर्यंतच्या 27.12 कि.मी. रस्त्यासाठी 941.61 कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे. शिप्पूर ते अंकलीपर्यंतच्या 10 कि.मी. रस्त्यासाठी 887.32 कोटी निधी खर्च केला जाणार आहे.  बेळगाव जिल्ह्यातील एकूण 4237.12 कोटी रुपये निधीमध्ये 121.8 कि.मी. लांब रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या विकासकामांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार इराण्णा कडाडी यांनी दिली आहे.