अनगोळच्या युवकाचा चिदंबरनगर स्मशानभूमीत मृतदेह

बऱ्याच दिवसांपासून नव्हता घरात बेळगाव : विद्यानगर, अनगोळ येथील एका युवकाचा स्मशानभूमीत मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून उद्यमबाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. किशन बालकृष्ण पवार (वय 35) रा. विद्यानगर, अनगोळ असे त्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी चिदंबरनगर येथील स्मशानभूमीत त्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. सोशल […]

अनगोळच्या युवकाचा चिदंबरनगर स्मशानभूमीत मृतदेह

बऱ्याच दिवसांपासून नव्हता घरात
बेळगाव : विद्यानगर, अनगोळ येथील एका युवकाचा स्मशानभूमीत मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून उद्यमबाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. किशन बालकृष्ण पवार (वय 35) रा. विद्यानगर, अनगोळ असे त्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी चिदंबरनगर येथील स्मशानभूमीत त्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. सोशल मीडियावरून त्याची छायाचित्रे सर्वत्र पाठविण्यात आली. दुपारी हा युवक अनगोळचा असल्याचे उघडकीस आले. यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून हा युवक आपल्या घरीही नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.