ईव्हीएमबाबत विनाकारण अफवांचे पेव

एलॉन मस्क, राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे सडेतोड उत्तर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरून (ईव्हीएम) निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी आरोप करणाऱ्यांना पुन्हा एकदा फटकारले. ईव्हीएमबाबत विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्न उपस्थित करत ती हॅक केली जाऊ शकतात […]

ईव्हीएमबाबत विनाकारण अफवांचे पेव

एलॉन मस्क, राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे सडेतोड उत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरून (ईव्हीएम) निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी आरोप करणाऱ्यांना पुन्हा एकदा फटकारले. ईव्हीएमबाबत विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्न उपस्थित करत ती हॅक केली जाऊ शकतात असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनेही ईव्हीएमवर निशाणा साधला. खासदार राहुल गांधी यांनी ईव्हीएम हा एक ‘ब्लॅक बॉक्स’ आहे, ज्याला तपासण्याची परवानगी कोणालाही नाही. साहजिकच भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत ‘गंभीर चिंता’ व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही, असे ते म्हणाले होते.
विरोधी पक्ष काही काळापासून ईव्हीएमवर चिंता व्यक्त करत आहेत. तसेच त्यांनी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट टेल’ (व्हीव्हीपीएटी) स्लिप्स 100 टक्के जुळवावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ती स्वीकारली नाही. न्यायालयीन सुनावणीत विरोधकांचे आरोप फेटाळण्यात आले असले तरीही काही नेते अजूनही ईव्हीएमविरोधात शंका-कुशंका उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या वापराचे समर्थन करत त्यात कोणतीही छेडछाड केली जाऊ शकत नसल्याचे सांगितले. तसेच ईव्हीएमबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवाही बंद कराव्यात, असे म्हटले आहे.