रिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती
शेतकऱ्यांना भू-संपादनाची भीती
बेळगाव : तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी रिंगरोडसाठी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी रिंगरोडबाबत आता सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. रिंगरोडसाठी शेतकऱ्यांनी कायम विरोध दर्शविला आहे. मात्र आता विरोध डावलून काही गावांमध्ये सर्वेक्षण सुरू झाले आहे. तालुक्यातील 31 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी या रोडमध्ये जाणार आहेत. तिबार पिके घेणाऱ्या जमिनी या रोडमध्ये जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जमीन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रोडसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील बेळगाव, आंबेवाडी, बाची, बिजगर्णी, गोजगा, होनगा, कडोली, काकती, कल्लेहोळ, संतिबस्तवाड आदी 31 गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले आहे. या रस्त्यामुळे काही शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे हा रस्ता होऊ नये, या भूमिकेत शेतकरी आहेत. मात्र प्राधिकरणाकडून गोजगा गावाजवळ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रिंगरोडमध्ये शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Home महत्वाची बातमी रिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती
रिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम हाती
शेतकऱ्यांना भू-संपादनाची भीती बेळगाव : तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी रिंगरोडसाठी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी रिंगरोडबाबत आता सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. रिंगरोडसाठी शेतकऱ्यांनी कायम विरोध दर्शविला आहे. मात्र आता विरोध डावलून काही गावांमध्ये सर्वेक्षण सुरू झाले आहे. तालुक्यातील 31 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी या रोडमध्ये जाणार […]