Solapur News: गुळवंची येथे अॅनिमियामुक्त भारत उपक्रम
योजनेद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत
सोलापुर: मुख्यमंत्री समुद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गुळवंची ग्रामपंचायत व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमिया मुक्त भारत उपक्रम राबविण्यात आला.
गावातील ३१७ महिला आणि किशोरवयीन मुली यांची प्रामुख्याने हिमोग्लोबीनची (रक्तातील लोह) तपासणी करण्यात आली. याबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी करून औषधोपचार देऊन समुपदेशन करण्यात आले.
अॅनिमिया ग्रस्त आढळून आलेल्या महिलांना औषधोपचार देण्यात आले. अॅनिमिया कशामुळे होतो, तो आजार न होण्यासाठी महिलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. आरोग्य विभागाकडून आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले. या योजनेद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत केले जातात.
यावेळी गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी सरवदे, सुनील तांबे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ए. झेड. मुलाणी, आरोग्य सेविका एस. जे. शेख, आरोग्य सेवक सोमनाय भोसले, आशा वर्कर रंजना कोरके, नूतन बोराडे, मंदाकिनी पिरके, अंगणवाडी सेविका मैनावती नवगिरे, सुंदर राठोड, छाया क्षीरसागर, संगीता साखरे, उमेदच्या विजया बोराडे, स्वयंम शिक्षण प्रयोग तालुका समन्वयक अश्विनी कोरके, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल बोराडे, विश्वजीत देशमुख तसेच गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेतला.
Home महत्वाची बातमी Solapur News: गुळवंची येथे अॅनिमियामुक्त भारत उपक्रम
Solapur News: गुळवंची येथे अॅनिमियामुक्त भारत उपक्रम
योजनेद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत सोलापुर: मुख्यमंत्री समुद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गुळवंची ग्रामपंचायत व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमिया मुक्त भारत उपक्रम राबविण्यात […]
