सहा आठवड्यांत 15, 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
कनिष्ठ कुस्तीपटूंच्या निदर्शनानंतर लगेच अस्थायी समितीकडून घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कुस्तीच्या प्रशासकीय कारभाराचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अस्थायी समितीने सहा आठवड्यांच्या आत 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी जंतर-मंतर येथे कनिष्ठ कुस्तीपटूंनी निदर्शने करून भारतीय ऑलिम्पिक समितीने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केल्यानंतर काही तासांतच ही घोषणा आली.
भारतातील अव्वल कुस्तीपटूंनी वर्षभर चालविलेल्या निदर्शनांचा मोठा फटका बसलेल्या तऊण कुस्तीपटूंच्या चिंतांची सदर समितीने दखल घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट या देशातील आघाडीच्या तीन कुस्तीपटूंनी निषेधसत्र सुरू केल्यानंतर त्याचा देशातील कुस्तीच्या विश्वाला मोठा फटका बसलेला आहे. जानेवारी, 2023 पासून राष्ट्रीय शिबिरे किंवा कनिष्ठ स्पर्धांचेही आयोजन झालेले नाही. शेकडो कनिष्ठ कुस्तीपटूंना पूर्ण एक वर्ष या कोंडीमुळे गमवावे लागले आहे.
त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष भूपेंद्र सिंग बजवा यांनी कनिष्ठ कुस्तीपटूंना आश्वासन दिले आहे की, ते लवकरच ग्वाल्हेरमध्ये उपकनिष्ठ आणि कनिष्ठ स्पर्धांचे आयोजन करतील. तऊण कुस्तीपटूंनी निदर्शनांदरम्यान उपस्थित केलेल्या चिंता अस्थायी समिती मान्य करते आणि या समस्यांचे निराकरण करण्यास वचनबद्ध आहे. समिती पुढील सहा आठवड्यांच्या आत ग्वाल्हेर येथे 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील गटांसाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करत आहे, असे बजवा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
अस्थायी समिती भारतातील कुस्तीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तसेच उत्कृष्टतेसाठी आपल्या पूर्ण वचनबद्धतेची पुष्टी करते. तऊण कुस्तीपटूंना या स्पर्धांसाठी प्रशिक्षण आणि सराव सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने संजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित समितीला निलंबित केल्यानंतर 27 डिसेंबर रोजी अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली होती.
Home महत्वाची बातमी सहा आठवड्यांत 15, 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
सहा आठवड्यांत 15, 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
कनिष्ठ कुस्तीपटूंच्या निदर्शनानंतर लगेच अस्थायी समितीकडून घोषणा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील कुस्तीच्या प्रशासकीय कारभाराचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अस्थायी समितीने सहा आठवड्यांच्या आत 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी जंतर-मंतर येथे कनिष्ठ कुस्तीपटूंनी निदर्शने करून भारतीय ऑलिम्पिक समितीने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केल्यानंतर काही तासांतच ही घोषणा […]
