ठाणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या भाचीच्या हत्येप्रकरणी मामाला अटक

ठाणे जिल्ह्यात बहिणीच्या 3 वर्षाच्या मुलीच्या हत्याप्रकरणी मुलीच्या मामाला पोलिसांनी अटक घेतली आहे. सदर माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या भाचीच्या हत्येप्रकरणी मामाला अटक

ठाणे जिल्ह्यात बहिणीच्या 3 वर्षाच्या मुलीच्या हत्याप्रकरणी मुलीच्या 38 वर्षीय  मामाला पोलिसांनी अटक घेतली आहे. सदर माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर परिसरातून ही मुलगी 18 नोव्हेंबर पासून बेपत्ता होती. तिचा अर्धवट जळालेला मृतदेह गुरुवारी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या झुडपात आढळला. 

 गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या मामाला अटक केली आहे. आरोपी ने मुलीला काही कारणास्तव चापट मारली ती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. आरोपीने मृतदेह जाळले आणि तिची विल्हेवाट लावण्यासाठी झुडुपात फेकले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची हत्याकरून मृतदेह जाळल्यावरून  आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

Edited By – Priya Dixit

 

Go to Source