अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धा चेन्नईत

चेन्नई : येथे 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेता गोवा चॅलेंजर्सचा सलामीचा सामना जयपूर पेट्रीऑट्स बरोबर होणार आहे. या स्पर्धेत गोवा चॅलेंजर्स आणि नवोदित जयपूर पेट्रीऑट्स यांच्यातील सलामीचा सामना येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघांचा समावेश आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 23 […]

अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धा चेन्नईत

चेन्नई : येथे 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेता गोवा चॅलेंजर्सचा सलामीचा सामना जयपूर पेट्रीऑट्स बरोबर होणार आहे. या स्पर्धेत गोवा चॅलेंजर्स आणि नवोदित जयपूर पेट्रीऑट्स यांच्यातील सलामीचा सामना येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघांचा समावेश आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 23 सामने खेळविले जाणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये देशातील अव्वल टेबल टेनिसपटू सहभाग दर्शविणार असून त्यामध्ये अचंता शरथ कमल, श्रीजा अकुला, मनिका बात्रा यांचा समावेश आहे. यशस्वीनी घोरपडे, दिया चितळे, पी. वैश्य, जीत चंद्रा, वाय. मलिक हे सहभागी होत आहेत.