रशियातील सोची जवळील तेल डेपो युक्रेनने ड्रोन हल्ल्यात उडवला

युक्रेनने रशियाच्या तेल डेपोवर भीषण हल्ला केला आहे. रविवारी, रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, काळ्या समुद्राच्या किनारी पर्यटन स्थळ सोचीजवळील तेल डेपोवर रात्री युक्रेनियन ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग लागली. या हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशियामधील …

रशियातील सोची जवळील तेल डेपो युक्रेनने ड्रोन हल्ल्यात उडवला

युक्रेनने रशियाच्या तेल डेपोवर भीषण हल्ला केला आहे. रविवारी, रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, काळ्या समुद्राच्या किनारी पर्यटन स्थळ सोचीजवळील तेल डेपोवर रात्री युक्रेनियन ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग लागली. या हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशियामधील हल्ल्यांची मालिका तीव्र झाली आहे. डेपोमध्ये ज्वाला आणि धुराचे लोट वेगाने उठताना दिसत आहेत.

ALSO READ: Russia -Ukraine War:रशियाने रात्रभर कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, 13 जणांचा मृत्यू,अनेक जखमी

क्रास्नोडार प्रदेशाचे गव्हर्नर वेनियामिन कोंड्रात्येव यांनी टेलिग्रामवर माहिती दिली की ड्रोन पाडल्यानंतर त्याचा मलबा इंधन टाकीवर आदळला ज्यामुळे आग लागली. आग विझवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये तेल डेपोच्या वर दाट धूर येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, रशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सोची विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.

ALSO READ: Russia Ukraine War:रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला, कीववर 300 ड्रोन टाकले, एकाचा मृत्यू

रशियाच्या व्होरोनेझ प्रदेशात आणखी एका युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रशिया आणि काळ्या समुद्रावर 93 युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले. दुसरीकडे, दक्षिण युक्रेनियन शहरातील मायकोलाईव्ह येथे रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका निवासी भागाला लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये सात जण जखमी झाले, असे युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले.

ALSO READ: Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनियन तुरुंगावर क्षेपणास्त्र डागले; 17 कैद्यांसह 22 जणांचा मृत्यू

युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की, रशियाने रविवारी युक्रेनवर 76 ड्रोन आणि 7 क्षेपणास्त्रे डागली. यापैकी 60ड्रोन आणि 1 क्षेपणास्त्र पाडण्यात आले, परंतु 16 ड्रोन आणि 6 क्षेपणास्त्रे आठ वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचली

Edited By – Priya Dixit

 

Go to Source