युगांडाचा वर्ल्डकपमधील पहिला विजय

कमी धावसंख्येच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीला नमवले वृत्तसंस्था /गयाना टी-20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी युगांडा व पापुआ न्यू गिनी या नवख्या संघात सामना खेळवला गेला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात युगांडाने बाजी मारताना पापुआ संघाला 3 गड्यांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पापुआ संघ 77 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर छोटेखानी धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी युगांडाला देखील 18.2 षटके खेळावी लागली. […]

युगांडाचा वर्ल्डकपमधील पहिला विजय

कमी धावसंख्येच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीला नमवले
वृत्तसंस्था /गयाना
टी-20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी युगांडा व पापुआ न्यू गिनी या नवख्या संघात सामना खेळवला गेला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात युगांडाने बाजी मारताना पापुआ संघाला 3 गड्यांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पापुआ संघ 77 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर छोटेखानी धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी युगांडाला देखील 18.2 षटके खेळावी लागली. युगांडाने विजयी लक्ष्य 18.2 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विशेष म्हणजे, युगांडा संघाचा हा वर्ल्डकपमधील पहिलाच विजय आहे. या विजयासह युगांडाला दोन गुण मिळाले आहेत. पापुआविरुद्ध विजय मिळवल्यानंतर युगांडाच्या खेळाडूंनी पारंपरिक पद्धतीने डान्स करत आपला आनंद साजरा केला.  दरम्यान, युगांडासाठी या सामन्यात 43 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज फ्रँक न्सुबुगाने आपल्या शानदार गोलंदाजीने टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात नवा विक्रम रचला आहे. फ्रँक न्सुबुगा टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट इकॉनॉमिकल 4 षटकांचा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. पापुआविरुद्ध सामन्यात न्सुबुगाने 4 षटकात 4 धावा दिल्या आणि 2 विकेट्सही घेतल्या. न्सुबुगापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या नावावर होता. त्याने याच वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध सामन्यात 4 षटकात 4 विकेट्स घेऊन 7 धावा दिल्या होत्या.